India vs vs Australia 3rd T20I I : होबार्टच्या मैदानातील तिसऱ्या टी-२० सामन्यात अखेर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. टॉस जिंकताच सूर्यानं ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शसमोर सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियन कर्णधारही सूर्याच्या आनंदात सामील झाला. त्याने सूर्याला जादूची झप्पी दिल्याचेही पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मालिका जिंकण्याची आस कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ तीन मोठ्या बदलासह मैदानात उतरला आहे. आशिया कप स्पर्धेत शुबमन गिलकडे भारतीय टी-२० संघाचे उपकर्णधारपद आल्यावर संजू सॅमसनचं संघातील स्थान धोक्यात आलं होते. गिलच्या कमबॅकनंतर संजू संघात दिसली. पण त्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये समझोता करावा लागला. आता त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
संजू सॅमसन आउट; सिंग इज किंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
टी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाचा नंबर वन गोलंदाज अर्शदीप सिंगची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. याशिवाय संजू सॅमसनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून त्याच्या जागी जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. वॉशिंग्टन सुंदरही तिसऱ्या सामन्यात खेळताना दिसेल.
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
भारताची प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (w), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेविड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुह्नेमन