Join us

IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच

भारतीय संघाने ९३ चेंडू आणि ९ विकेट्स राखून हा सामना संपवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 22:10 IST

Open in App

Asia Cup 2025  India Beats UAE By 9 Wickets Just 27 Balls : आशिया कप स्पर्धेतील यूएईविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे अगदी सहज विजय मिळवलाय. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारतीय संघाने यूएईच्या संघाला ५७ धावांवर आटोपले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. अभिषेक शर्मानं षटकार मारत संघाचे खाते उघडून मॅच लवकर संपवण्याचे संकेत दिले. तो १६ चेंडूत ३० धावा करून माघारी फिरल्यावर शुबमन गिल आणि भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं २७ व्या चेंडूवर सामना खिशात घातला. शुबमन गिलनं खणखणीत चौकारासह संघाचा विजय निश्चित केला. भारतीय संघाने ९३ चेंडू आणि ९ विकेट्स राखून हा सामना संपवला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

UAE च्या कॅप्टन्सह  दोघांनीच गाठला दुहेरी आकडा, संघाचा डाव ५७ धावांत आटोपला

सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर यूएईच्या सलामी जोडीनं चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी कर्णधार मुहम्मद वसीम आणि अलिशान शराफू या दोघांनी २६ धावांची भागीदारी रचली. बुमराहनं लयीत खेळणाऱ्या अलिशानला सर्वोत्तम यॉर्कर चेंडूवर बोल्ड केले. कुलदीपनं UAE च्या कर्णधाराला १९ धावांवर बाद केले. या दोघांशिवाय अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी युएईचा संघ १३ .१ षटकात ५७ धावांवरच आटोपला होता. 

रुमाल पडला; बॅटर क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं ठरवलं Not Out

कुलदीपसह शिवम दुबेनंही गोलंदाजीत दाखवली जादू

टीम इंडियाकडून कुलदीप यादवनं  २.१ षटकात ७ धावा खर्च करत भारताकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय शिवम दुबेनं २ षटकात ४ धावा खर्च करून ३ विकेट्सचा डाव साधला.  हार्दिक पांड्या सोडला तर प्रत्येकाने आपल्या गोलंदाजीवर एक विकेट मिळवली. 

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपअभिषेक शर्माशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ