India vs Sri Lanka 3rd T20I : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू विलगिकरणात आहेत. अशात दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चार नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली, त्यात आता आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या राखीव फळीतील १० प्रमुख खेळाडू मालिकेबाहेर झाले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कर्णधार शिखर धवन प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतो याची सर्वांना उत्सुकता आहे.
भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात गोलंदाज नवदीप सैनी याला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली आणि तो आजचा सामना खेळण्याची शक्यता फार कमी आहे. श्रीलंकेनं हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया आज कोणत्या खेळाडूंना संधी देणार याची सर्वांन उत्सुकता लागली आहे. बीसीसीआयनं काल जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार इशान पोरेल, संदीप वॉरियर, सिमरजीत सिंग आणि आर साई किशोर या नेट बॉलर्सची प्रमुख संघात निवड केली गेली. नवदीप सैनीच्या अनुपस्थितीत यापैकी संदीप वॉरियरची निवड केली जाऊ शकते.
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे म्हणतात, वैद्यकिय टीम नवदीप सैनीच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. सामन्यापूर्वी त्याच्या समावेशाबद्दल निर्णय घेतला जाईल.