भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला. भारतानं या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. भारताच्या फलंदाजानंतर जलदगती गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानं लंकेला हादरे दिले. जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांनी टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला.
10:05 PM
मॅथ्यूज आणि धनंजया डी सिल्वा या अनुभवी खेळाडूनं पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना श्रीलंकेच्या आशा जीवंत राखल्या होत्या. 12व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरनं ही जोडी तोडली. त्यानं मॅथ्यूजला बाद केले. मॅथ्यूज 31 धावा करून माघारी परतला. शार्दूलनं गोलंदाजीतही कमाल केली. त्यानं दानूश शनाकाला बाद करून श्रीलंकेला सहावा धक्का दिला. त्याच षटकात युजवेंद्र चहलनं अप्रतिम थ्रो करताना वनिंदू हसरंगाला धावबाद करून तंबूत पाठवले. धनंजयानं 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-20तील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले.
09:43 PM

09:31 PM
पाहा श्रीलंकेच्या चार विकेट्स कशा गेल्या...
09:29 PM
नवदीप सैनीनं पुन्हा उडवला दांडा
09:28 PM
पाहा शार्दूल ठाकूरची फटकेबाजी
09:25 PM
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहनं धक्का दिला. बुमराहनं लंकेच्या दानुष्का गुणथिलकाला (1) वॉशिंग्टन सुंदरकरवी झेलबाद केले. त्यानंतर शार्दूल ठाकूरनं दुसऱ्या षटकात अविष्का फर्नांडोला बाद केले. ओशादा फर्नांडो धावबाद झाला, तर नवदीप सैनीनं अप्रतिम यॉर्कर टाकून कुसर परेराचा त्रिफळा उडवला. श्रीलंकेचे चार फलंदाज 26 धावांत माघारी परतले होते. पॉवर प्लेमध्ये लंकेला 35 धावा करता आल्या.
08:05 PM
लोकेश राहुल खेळपट्टीवर जम बसवून होता. त्यानंही 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्यानं संदाकनच्या पुढच्या चेंडूवर खणखणीत चौकार मारला, पण लगेच पुढील चेंडूवर तो यष्टिचीत झाला. श्रेयस अय्यरनं पहिल्या चेंडूवर चौकार मारला, परंतु दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाच्याच हातात झेल देऊन तंबूत परतला.
07:58 PM
पण, दुसऱ्याच चेंडूवर संजू पायचीत होऊन माघारी परतला. वनिंदू हसरंगानं त्याला बाद केले.
07:56 PM
धवनने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, लक्षण संदाकनच्या गोलंदाजीवर धवन बाद झाला. धवनने 36 चेंडूंत 52 धावा केल्या. गब्बर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. सॅमसनचा हा फटका पाहून डगआउटमध्ये बसलेला कोहलीही उभा राहून टाळ्या वाजवू लागला.
07:34 PM
पहिला पॉवर प्ले टीम इंडियाच्या बाजूनं राहिला. दुसऱ्याच षटकात मिळालेल्या जीवदानानंतर शिखर धवननं सावध खेळ केला. पण, दुसऱ्या बाजूनं लोकेश राहुलनं फटकेबाजी केली. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झाल्यानंतर धवनही रंगात आला. त्यानेही श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये टीम इंडियासाठी 63 धावा जोडल्या.
06:52 PM

06:52 PM

06:24 PM
काय सांगतो खेळपट्टीचा अंदाज?
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी...आज चौकार-षटकारांचा पाऊस पडणार असल्याची शक्यता माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी वर्तवली आहे. ते म्हणाले,'' सुरुवातीला गोलंदाजांना स्वींग करण्यासाठी मदत मिळेल, परंतु ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरेल.''