Join us

नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) आतापर्यंत राखून ठेवलेली महत्त्वपूर्ण खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 21:19 IST

Open in App

IND vs SA Live Scorecard : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) आतापर्यंत राखून ठेवलेली महत्त्वपूर्ण खेळी केली. रोहित शर्मा, रिषभ पंत व सूर्यकुमार यादव ३४ धावांत माघारी परतले असताना विराट व अक्षर पटेल यांनी भारताचा डाव सावरला. उपांत्य फेरीच्या लढतीनंतर अक्षरने पुन्हा एकदा त्याची उपयुक्तता सिद्ध केली. अक्षरने विराटसह चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. 

रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याच प्लेइंग इलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने ४,४,२,४ असे फटके खेचून इरादा स्पष्ट केला. दुसऱ्या षटकात केशव महाराज गोलंदाजीला आला अन् रोहितने २ चौकारांनी त्याचे स्वागत केले. पण, चौथ्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रोहित ( ९) हेनरिच क्लासेनला झेल देऊन माघारी परतला. शेवटच्या चेंडूवर रिषभ पंत ( ०) स्वीप मारण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाच्या हाती झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवला ( ३) कागिसो रबाडाने जाळ्यात ओढले अन् क्लासेनने आणखी एक अफलातून झेल टीपून भारताला ३४ धावांत तिसरा धक्का दिला. विराट चांगल्या टचमध्ये दिसला आणि संघाने पॉवर प्लेमध्ये ३ बाद ४५ धावा चढवल्या. अक्षर पटेलला पुन्हा एकदा फलंदाजीत बढती मिळाली आणि त्याने हवेच्या दिशेचा फायदा उचलताना दोन खणखणीत षटकार हाणले. भारताने पहिल्या १० षटकांत ३ बाद ७५ धावा केल्या. विराट व अक्षर यांनी ४२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. तब्रेझ शम्सीला टार्गेट करताना अक्षरने मिड ऑनवर षटकार खेचला. कागिसो रबाडाने टाकलेला चेंडूही त्याने त्याच दिशेने सीमापार पाठवला. विराट अन् अक्षरची ५४ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी दुर्दैवीरित्या संपुष्टात आली. क्विंटन डी कॉकच्या थ्रोवर अक्षर ( ४७ धावा, ३१ चेंडू, १ चौकार व ४ षटकार) रन आऊट झाला. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाअक्षर पटेलक्विन्टन डि कॉक