Join us

IND vs SA  Live Match : केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलचा इतिहास पाहता ८ पैकी ७ सामने टॉस जिंकणारा संघ जिंकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 20:24 IST

Open in App

IND vs SA Live Scorecard : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलसाठी व्यासपीठ सजलं आहे. निळ्याशार आकाशाखाली हिरवळीने नटलेले केनसिंग्टन ओव्हल सुंदर दिसत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलचा इतिहास पाहता ८ पैकी ७ सामने टॉस जिंकणारा संघ जिंकला आहे. पण, २००७ ( भारत)  व २०१२ ( वेस्ट इंडिज) च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकले आहेत. त्यामुळे आज टीम इंडियाला पुन्हा हा इतिहास घडवण्याची संधी आहे. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याच प्लेइंग इलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ चा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल टॉस जिंकूनही हरला होता. 

मागील चार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. पहिल्या चेंडूचा सामना करण्यापूर्वी विराट कोहली मैदानावर काही सेकंदासाठी डोळे बंद करून शांत बसलेला दिसला. त्यानंतर त्याने ४,४,२,४ असे फटके खेचून इरादा स्पष्ट केला. दुसऱ्या षटकात केशव महाराज गोलंदाजीला आला अन् रोहितने २ चौकारांनी त्याचे स्वागत केले. पण, चौथ्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रोहित ( ९) हेनरिच क्लासेनला झेल देऊन माघारी परतला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रिषभ पंत ( ०) स्वीप मारण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाच्या हाती झेलबाद झाला आणि भारताला २३ धावांत दुसरा धक्का बसला. केशव महाराज हा 'राम' भक्त आहे आणि रामाचं नाव घेऊन तो मैदानावर उतरला होता. 

कागिसो रबाडाच्या चेंडूवर सुर्यकुमार यादवने ( ३) पुल शॉट मारला, परंतु हेनरिच क्लासेनने अफलातून झेल टिपला. भारताला ३४ धावांवर ३ धक्के बसले.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मारिषभ पंतसूर्यकुमार अशोक यादव