Join us

India vs South Africa T20I Series : आयपीएल संपले आता भारतीय खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार; जाणून घ्या आगामी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

India vs South Africa T20I Series : दोन महिने इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केल्यानंतर आता भारतीय खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 16:41 IST

Open in App

India vs South Africa T20I Series : दोन महिने इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केल्यानंतर आता भारतीय खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत. ९ जूनपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग १२ ट्वेंटी-२० सामने जिंकून अफगाणिस्ताच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.  रोहित, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली भारताला ही विजयी  पताका अशीच फडकवत ठेवायची आहे. भारताने पहिला सामना जिंकल्यास सलग १३ ट्वेंटी-२० सामना जिंकणारा तो जगातील पहिला संघ ठरणार आहे.

लोकेश राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांचे आफ्रिका मालिकेत खेळणे अनिश्चित!

रिषभ पंतकडे उपकर्णधारपद आहे. हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक यांचे या मालिकेतून ट्वेंटी-२० संघात पुनरागमन होत आहे. उम्रान मलिक व अर्षदीप सिंग यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत भारताच्या दुसऱ्या फळीवर सर्वांचे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघ  

  1. भारत- लोकेश राहुल ( कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उम्रान मलिक  
  2. दक्षिण आफ्रिका - टेम्बा वबुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेड्रीक्स, हेनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेज शम्सी, त्रिस्तान स्तुब्ब्स, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, मार्को येनसेन 

 

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्ली
  • दुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटक
  • तिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाक
  • चौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोट
  • पाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू 

 

सामन्याची वेळ व थेट प्रक्षेपण- भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील  सर्व सामने सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील.  स्टार स्पोर्ट्स  व  Disney+Hotstar वर हे सामने पाहता येतील. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाटी-20 क्रिकेटआयपीएल २०२२लोकेश राहुल
Open in App