Join us  

India vs South Africa : Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी BCCI च्या टीम इंडियाला टिप्स, तुम्हालाही होईल फायदा

India vs South Africa : बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने बुधवारी टीम इंडियाच्या खेळाडूंना Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 6:25 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) वैद्यकीय टीमने बुधवारी टीम इंडियाच्या खेळाडूंना Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. भारतीय संघातील खेळाडू, साहाय्यक कर्मचारी या सर्वांना त्याचे पालन करावेच लागणार आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केली महत्त्वपूर्ण सूचना, आयपीएल खेळवा पण...

कोरोना विषाणूंमुळे चीनमध्ये मंगळवारी आणखी १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे चीनमधील बळींची संख्या आता ३१३६ झाली आहे. या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ४०११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूची लागण आतापर्यंत एक लाख १० हजार नागरिकांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या पहिल्या वन डे सामन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. भारतीय संघानेही एक निर्णय घेतला आहे.

शिखर, हार्दिक, भुवनेश्वर परतणार; असे असणार टीम इंडियाचे अंतिम ११ शिलेदार!

बीसीसीआयनं एअरलाईन्स, टीम हॉटेल्स, राज्य संघटना आणि वैद्यकीय टीमला सेवा पुरवताना सॅनिटायझरचा वापर करण्यास सक्तीचे केले आहेत. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठीही बीसीसीआय राज्य संघटनांसह हेल्थकेअर सुविधा पुरवणार आहे. तसेच स्टेडियममधील सार्वजनिक शौचालयात हँडवॉश लिक्विड आणि सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे.  

काय कराव, काय करू नये?

  • किमान २० सेकंद पाणी आणि साबणाने हात धुवा  
  • हँड सॅनिटायझरचा वापर करा
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवा
  • ताप, खोकला किंवा कोणत्याची आजारपणाची लक्षणे दिसताच वैद्यकीय टीमला त्वरीत कळवा
  • हात धुतल्याशिवाय तोंड, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळा
  • नव्या ठिकाणी खाणं टाळा
  • हस्तांदोलन किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोनवरून सेल्फी काढणे टाळा

   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona वगैरे विसरा... क्रिकेट अन् आयपीएलचा आनंद लुटा... BCCI ची तिजोरी भरा!

सचिन तेंडुलकर पहिल्याच षटकात माघारी, पण इरफानची फटकेबाजी लै भारी!

 IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

भारत-पाकिस्तान भांडणामुळे ICCसमोर पेच; वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, पण...

विराट कोहलीचे Social Account बंद करण्याच्या याचिकेला तुफान प्रतिसाद; कारण ऐकून बसेल धक्का

Corona Virusची टीम इंडियाच्या खेळाडूंना धास्ती; महत्त्वपूर्ण निर्णय

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाकोरोनाबीसीसीआय