India vs South Africa, 1st ODI : Corona Virusची टीम इंडियाच्या खेळाडूंना धास्ती; महत्त्वपूर्ण निर्णय

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : न्यूझीलंड दौऱ्यावर सपाटून मार खावून मायदेशी परतलेला भारतीय संघ घरच्या मैदानावर मर्दुमकी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 03:49 PM2020-03-11T15:49:13+5:302020-03-11T15:54:24+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 1st ODI : India may limit the usage of saliva for shining ball due to Coronavirus threat, says Bhuvneshwar svg | India vs South Africa, 1st ODI : Corona Virusची टीम इंडियाच्या खेळाडूंना धास्ती; महत्त्वपूर्ण निर्णय

India vs South Africa, 1st ODI : Corona Virusची टीम इंडियाच्या खेळाडूंना धास्ती; महत्त्वपूर्ण निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : न्यूझीलंड दौऱ्यावर सपाटून मार खावून मायदेशी परतलेला भारतीय संघ घरच्या मैदानावर मर्दुमकी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला वन डे सामना गुरुवारी धर्मशाला येथे होणार आहे. कोरोना विषाणूंमुळे आफ्रिकेच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या खेळाडूंना हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांच्या वैद्यकीय टीमने खेळाडूंना सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सूचनाही केल्या आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंनीही कोरोनाची धास्ती घेतली आहे आणि त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बुधवारी दिली.

कोरोना विषाणूंमुळे चीनमध्ये मंगळवारी आणखी १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे चीनमधील बळींची संख्या आता ३१३६ झाली आहे. या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत ४०११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूची लागण आतापर्यंत एक लाख १० हजार नागरिकांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या पहिल्या वन डे सामन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. भारतीय संघानेही एक निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या सामन्यात चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा कमीतकमी वापर करणार असल्याचे भुवीनं सांगितलं. पण, यावेळी त्यानं एक अडचण मांडून संभ्रम निर्माण केला. हार्निया सर्जरीनंतर भुवी टीम इंडियात पुनरागमन करत आहे. तो म्हणाला,'' लाळेचा वापर न करण्याबाबत आम्ही विचार केला, परंतु चेंडू चमकवण्यासाठी लाळ वापरणारच नाही, हे मी आताच सांगू शकत नाही. आम्ही लाळ वापरली नाही, तर चेंडू चमकणार कसा. तसे न केल्यानं गोलंदाजीवर परिणाम होईल आणि मग तुम्हीच म्हणाल, की गोलंदाजी चांगली केली नाही म्हणून.''

भारतात आतापर्यंत कोरोनाचे ६० संशयीत रुग्ण आढळले आहेत आणि त्यामुळे आयपीएलच्या १३व्या मोसमावर संकट निर्माण झाले आहे. २९ मार्चपासून आयपीएलच्या १३व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. भुवीने मात्र या चर्चा धुडकावून लावल्या. तो म्हणाला,''आयपीएल होणार की नाही, यावर आत्ताच काही सांगू शकत नाही. पण, आम्ही सर्व खबरदारी घेणार आहोत. आमच्यासोबत डॉक्टर असणार आहेत आणि ते आम्हाला वेळोवेळी सल्ला देत आहेत.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona वगैरे विसरा... क्रिकेट अन् आयपीएलचा आनंद लुटा... BCCI ची तिजोरी भरा!

सचिन तेंडुलकर पहिल्याच षटकात माघारी, पण इरफानची फटकेबाजी लै भारी!

 IPL रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

भारत-पाकिस्तान भांडणामुळे ICCसमोर पेच; वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले, पण...

विराट कोहलीचे Social Account बंद करण्याच्या याचिकेला तुफान प्रतिसाद; कारण ऐकून बसेल धक्का

Web Title: India vs South Africa, 1st ODI : India may limit the usage of saliva for shining ball due to Coronavirus threat, says Bhuvneshwar svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.