India vs South Africa 2nd ODI Live Streaming: कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत अगदी धमाक्यात सुरुवात केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघाचा कार्यवाही कर्णधार लोकेश राहुलला टॉस वेळा पदरी निराशा आली. टेम्बा बावुमाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने सलग २० वनडे सामन्यात टॉस गमावला आहे.
रायपूरच्या मैदानात आतापर्यंत फक्त एकमेव एकदिवसीय सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात रोहित शर्मानं भारताकडून सर्वोच्च ५१ धावांची खेळी केली होती. चाहते पुन्हा एकदा हिटमॅनच्या हिट शोसाठी आतूर असतील. रोहितशिवाय या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीवर नजरा असतील. त्याने रांची वनडेत शतकी खेळी साकारली होती. इथं एक नजर टाकुयात IND vs SA आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यातील Live Streaming संदर्भातील सविस्तर...
IND vs SA 2nd ODI सामना कुठं पाहता येईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पाहता येईल. याशिवाय टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर या सामन्याचा क्रिकेट चाहते आनंद घेऊ शकतील.
भारत (India Playing XI)
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका (South Africa Playing XI)
क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), एडन मार्करम, टेंबा बावुमा (कर्णधार),मॅथ्यू ब्रिट्झके, टोनी डी झॉर्जी,डिवाल्ड ब्रेव्हिस,मार्को जान्सन, कॉर्बिन बॉश,केशव महाराज, नँद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.