कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य

दोन शतकवीर अन् कर्णधार केएल राहुलचं कडक अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:34 IST2025-12-03T17:25:47+5:302025-12-03T17:34:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs South Africa LIVE Score 2nd ODI Virat Kohli An Ruturaj Gaikwad Centuries KL Rahul Fifty India To 358 For 5 South Africa Need 359 Runs To Win | कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य

कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य

India vs South Africa 2nd ODI :  रायपूरच्या मैदानातील सामन्यात किंग कोहलीचे सलग दुसरे शतक आणि ऋतुराज गायकवाडच्या वनडेतील पहिल्या शतकानंतर लोकेश राहुलचा जलवा  पाहायला मिळाला. या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आलेल्या भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३५८ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर ३५९ धावांचे टार्गेट सेट केले आहे.  

रोहितसह यशस्वी स्वस्तात फिरले माघारी

 दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुल हा टॉस वेळी पुन्हा कमनशिबी ठरला. टेम्बा बावुमानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मानं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर ४० धावा असातना रोहित शर्मा ८ चेंडूत १४ धावा करून तंबूत परतला.  नांद्रे बर्गर यानं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मार्को यान्सेन याने यशस्वी जैस्वालच्या खेळीला ब्रेक लावाला. तो ३८ चेंडूत २२ धावांची खेळी करून परतला.

विराट-ऋुतुराज जोडी जमली

सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यावर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. ऋतुराज गायकवाडनं वनडेतील पहिले शतक झळकावताना ८३ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०५ धावांची खेळी केली.  विराट कोहलीनं सलग दुसरे शतक झळकावताना ९३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १०२ धावांची खेळी साकारली.

 

Web Title : कोहली, रुतुराज के शतक; केएल राहुल का अर्धशतक! भारत ने 359 का लक्ष्य रखा।

Web Summary : विराट कोहली और रुतुराज गायकवाड़ के शतकों और केएल राहुल के अर्धशतक की बदौलत भारत ने रायपुर में टॉस हारने के बाद दक्षिण अफ्रीका के खिलाफ दूसरे वनडे में 358/5 रन बनाए। भारत ने 359 रनों का लक्ष्य रखा।

Web Title : Kohli, Ruturaj centuries; KL Rahul's fifty! India sets 359 target.

Web Summary : Virat Kohli and Ruturaj Gaikwad's centuries, along with KL Rahul's fifty, powered India to 358/5 against South Africa in the second ODI after losing the toss in Raipur. India set a target of 359 runs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.