IND vs SA 1st Test Team India All Out 189 And Lead By 30 Runs : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने अल्प आघाडी घेतली. पण टीम इंडियाचा डावही अर्धशतकाशिवाय २०० धावांच्या आतच आटोपल्याचे पाहायला मिळाले. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. तो शेवटपर्यंत फलंदाजीला आला नाही. त्यामुळे १८९ धावांवर नववी विकेट गमावल्यावर भारतीय संघाचा पहिला डाव संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात १५९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या डावात ३० धावांची अल्प आघाडी घेतली. पण टीम इंडियाच्या ताफ्यातूनही एकही बॅटर ४० धावांचा आकडा गाठू शकला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही संघाकडून KL राहुल टॉपर!
भारतीय संघाकडून सलामीवीर लोकेश राहुल याने ११९ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि एकाक षटकाराच्या मदतीने ३९ धावांची खेळी केली. ही खेळी दोन्ही संघाकडून कोणत्याही खेळाडूनं केलेली सर्वोच्च खेळी ठरली. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर २९ (८२), रिषभ पंत २७ (२४) आणि रवींद्र जडेजा २७ (४५), ध्रुव जुरेल १४ (१४), अक्षर पटेल १६ (४५) आणि यशस्वी जैस्वाल १२ (२७) यांनी भारतीय संघाकडून पहिल्या डावात दुहेरी धावांचा आकडा गाठला. पण एकालाही चाळीशी पार धावसंख्या करता आली नाही.
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
सायमन हार्मरचा 'चौकार'
दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू सायमन हार्मर याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. १५. २ षटकांची गोलंदाजी करताना ३० धावा खर्च करत त्याने वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल आणि अक्षर पटेलची विकेट घेतली. मार्को यान्सेन याने ३ तर केशव महाराज आणि कॉर्बिन बॉश या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.