IND vs SA 1st Test Day 1 Stumps : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिला दिवस जसप्रीत बुमराहनं गाजवला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत धाडत बुमराहनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या खेळात ५५ षटकातच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १५९ धावांत आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी ठरला अपयशी! टीम इंडियानं स्वस्तात गमावली पहिली विकेट
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अल्प धावांत गुंडाळल्यावर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल जोडीनं भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात केली. यशस्वी जैस्वालच्या रुपात टीम इंडियाने धावफकावर अवघ्या १८ धावा असताना पहिली विकेट गमावली. यशस्वीनं २७ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने १२ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी टीम इंडियाने या एका विकेटच्या मोबदल्यात ३७ धावा केल्या होत्या. केएल राहुल १३ (५९) आणि वॉशिंग्टन सुंदर ६ (३८) ही जोडी मैदानात खेळत होती. भारतीय संघ १२२ धावांनी पिछाडीवर असून दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मोठ्या आघाडीसह सामन्यावर मजबूत पकड मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
दुसऱ्या दिवशी तिसऱ्या क्रमांकाच्या प्रयोगावर असतील खास नजरा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय संघ चार फिरकीपटूसह मैदानात उतरला आहे. वॉशिंग्टनला संघात घेण्यासाठी टीम इंडियाने तिसऱ्या क्रमांकाला नवा प्रयोग आजमावल्याचे पाहायला मिळाले. साई सुदर्शनला बाकावर बसून तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली. पुजारानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा वॉशिंग्ट सुंदर हा सातवा फलंदाज आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी ठरणार ते पाहण्याजोगे असेल.
पुजारानंतर कोणत्या फलंदाजाने किती वेळा केली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी
- शुभमन गिल -२९ डाव
- साई सुदर्शन - ९ डाव
- करुण नायर - ४ डाव
- विराट कोहली- २ डाव
- देवदत्त पडिक्कल- २ डाव
- केएल राहुल - २ डाव
कोलकाताच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ हतबल ठरला. एडन मार्करम ३१ (४८), रियान रिक्लटन २३ (२२), वियान मुल्डर २४ (५१), टोनी झॉर्जी २४ (५५), स्टब्स १५ (७४) आणि काइल व्हेरेइन १६ (३६) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण एकालाही ही खेळी बहरता आली नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ तर अक्षर पटेलनं एक विकेट घेतली.