Join us

Rahul-Mayank vs Gambhir-Sehwag, Ind vs SA 3rd Test: तुझी माझी जमली जोडी! राहुल-मयंक जोडीने मोडला सेहवाग-गंभीर जोडगोळीचा विक्रम

भारतीय कर्णधाराचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फसला, पण मयंक-राहुल जोडीने त्यातही एक मोठा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 20:11 IST

Open in App

Rahul-Mayank vs Gambhir-Sehwag, Ind vs SA 3rd Test: भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण भारतीय कर्णधाराचा हा निर्णय काहीसा फसला. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढे २००च्या आतच भारताचे महत्त्वाचे सहा फलंदाज माघारी परतले. राहुल, मयंक, पुजारा, रहाणे, पंत आणि अश्विन या सहाच्या सहा फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. विराट कोहलीने मात्र केपटाउनच्या मैदानावर शांत आणि संयमी खेळी करत अर्धशतक झळकावले. भारताची फलंदाजी फारशी चांगली झाली नसली, तरी भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी आफ्रिकेत मोठा पराक्रम करून दाखवला.

मयंक आणि राहुल हे दोघेही संघाला पन्नाशीदेखील गाठून देऊ शकले नाहीत. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. असं असलं तरीही त्यांनी एक महत्त्वाचा पराक्रम केला. राहुल आणि मयंक ही जोडी आफ्रिकेच्या मैदानावर एकूण २०० पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली. राहुल-मयंक जोडीने सलामीला फलंदाजी करताना २२० धावांची एकूण भागीदारी केली. 

विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या दोघांनी सलामीला खेळताना आफ्रिकेत सर्वाधिक १८४ धावांची भागीदारी केली होती. भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर आणि दिनेश कार्तिक हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १५३ धावांची एकूण भागीदारी केली होती.

दरम्यान, मंगळवारी सामना सुरू होताच राहुलला ओलिव्हियरने वेगवान गोलंदाजी करताना १२ धावांवर माघारी धाडले. तर मयंक अग्रवालला कगिसो रबाडाने १५ धावांवर बाद केले. त्यामुळे भारतीय डावाची अवस्था ३१/० वरून ३३/२ अशी झाली होती. त्यानंतरही भारतीय फलंदाजांना डाव सावरता आला नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामयांक अग्रवाललोकेश राहुलविरेंद्र सेहवागगौतम गंभीर
Open in App