Rahul-Mayank vs Gambhir-Sehwag, Ind vs SA 3rd Test: भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण भारतीय कर्णधाराचा हा निर्णय काहीसा फसला. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढे २००च्या आतच भारताचे महत्त्वाचे सहा फलंदाज माघारी परतले. राहुल, मयंक, पुजारा, रहाणे, पंत आणि अश्विन या सहाच्या सहा फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. विराट कोहलीने मात्र केपटाउनच्या मैदानावर शांत आणि संयमी खेळी करत अर्धशतक झळकावले. भारताची फलंदाजी फारशी चांगली झाली नसली, तरी भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी आफ्रिकेत मोठा पराक्रम करून दाखवला.
मयंक आणि राहुल हे दोघेही संघाला पन्नाशीदेखील गाठून देऊ शकले नाहीत. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. असं असलं तरीही त्यांनी एक महत्त्वाचा पराक्रम केला. राहुल आणि मयंक ही जोडी आफ्रिकेच्या मैदानावर एकूण २०० पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली. राहुल-मयंक जोडीने सलामीला फलंदाजी करताना २२० धावांची एकूण भागीदारी केली.
विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या दोघांनी सलामीला खेळताना आफ्रिकेत सर्वाधिक १८४ धावांची भागीदारी केली होती. भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर आणि दिनेश कार्तिक हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १५३ धावांची एकूण भागीदारी केली होती.
दरम्यान, मंगळवारी सामना सुरू होताच राहुलला ओलिव्हियरने वेगवान गोलंदाजी करताना १२ धावांवर माघारी धाडले. तर मयंक अग्रवालला कगिसो रबाडाने १५ धावांवर बाद केले. त्यामुळे भारतीय डावाची अवस्था ३१/० वरून ३३/२ अशी झाली होती. त्यानंतरही भारतीय फलंदाजांना डाव सावरता आला नाही.
Web Title: India vs South Africa 3rd Test Cape town KL Rahul Mayank Agarwal breaks Gautam Gambhir Virender Sehwag Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.