India vs South Africa 3rd T20I Live Marathi : भारतीय गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेची कोंडी केली आहे. २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना ४ धक्के बसले आहेत. पण, यापेक्षा मोठा धक्का भारताला बसला आहे. शतकवीर सूर्यकुमार यादवला दुखापत झाली आणि त्याला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले. रवींद्र जडेजा स्टँड इन कॅप्टन आहे.

यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांनी टीम इंडियासाठी मोक्याच्या सामन्यात धडाकेबाज खेळ केला. शुबमन गिल ( १२) व तिलक वर्मा ( ०) हे सलग दोन चेंडूंवर बाद झाल्यानंतर यशस्वी व सूर्याने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० चेंडूंत ११२ धावांची भागादीर केली. यशस्वी ४१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. रिंकू सिंगने ( १४) सूर्यासह २६ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी केली. सूर्याने ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावा केल्या. चार वेगवेगळ्या संघांविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. भारताने २० षटकांत ७ बाद २०१ धावा उभ्या केल्या.
मोहम्मद सिराजने पहिल्याच षटका आफ्रिकेला दबावाखाली आणले. त्या निर्धाव षटकानंतर दुसऱ्या षटकात मुकेश कुमारने आफ्रिकेचा सलामीवीर मॅथ्यू ब्रित्झकीला ( ४) त्रिफळाचीत केले. चौथ्या षटकात आफ्रिकेचा सलामीवीर रिझा हेंड्रीक्स ( ८) याला मोहम्मद सिराजने रन आऊट केले. हेनरीच क्लासेनला ( ५) अर्शदीप सिंगने आणि कर्णधार एडन मार्करामला ( २५) रवींद्र जडेजाने बाद केले. आफ्रिकेची अवस्था ४ बाद ४२ अशी झाली. दरम्यान, सूर्यकुमारची दुखापत किती गंभीर आहे याचे अपडेट्स हाती आलेले नाहीत,
