Join us

India vs South Africa, 3rd T20I: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात 'या' भारतीय खेळाडूच्या कामगिरीवर असणार लक्ष

भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा पहिला ट्वेंटी- 20 सामना रद्द झाल्यानंतर दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 12:30 IST

Open in App

बंगळुरु: भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा पहिला ट्वेंटी- 20 सामना रद्द झाल्यानंतर दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला होता. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच आज तिसरा ट्वेंटी- 20 सामना रंगणार असून भारत या सामन्याच्या विजयासह ट्वेंटी- 20 मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी सज्ज झाला असला तरी भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतवर सर्वांच्या नजरा असणार आहे.  

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात ऋषभ पंतला 4 धावात करुन बाद झाला होता. त्यामुळे तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात तरी भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत चांगली खेळी खेळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात देखील पंतला फलंदाजीत चमक दाखवता आली नव्हती. तसेच पंतने फलंदाजीबद्दला दृष्टिकोन बदलायला हवा नाहीतर त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते असा इशारा देखील भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतला दिला होता. पंतला अनेक सामन्यात चांगली खेळी खेळता न आल्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने ऋषभ पंत ऐवजी संजू सॅमसनला संधी देण्यात यावी असा सल्ला देखील बीसीसीआयला दिला होता.

दरम्यान दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात शिखर धवन ( 40) आणि कर्णधार विराट कोहली ( 72*) यांच्या दमदार खेळीनं हा विजय सोपा केला. गोलंदाजीत दीपक चहरने दोन विकेट्स घेतल्या होत्या. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

संभाव्य संघभारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी. 

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा  हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत