Join us

India vs South Africa 1st Test: "अज्जू भैय्या, हम बच गये.."; रहाणेला संघात स्थान मिळताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

गेल्या काही महिन्यातील रहाणेची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्याला संघातून वगळण्याची चर्चा सुरू होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 14:33 IST

Open in App

India vs South Africa 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉसच्या वेळी त्याने अंतिम संघ जाहीर केला. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याचा गेल्या काही महिन्यांमधील फॉर्म पाहता त्याला संघातून वगळलं जाईल आणि त्याच्या जागी हनुमा विहारी किंवा नवखा श्रेयस अय्यर याला संघात समाविष्ट केलं जाईल अशी चर्चा रंगली होती. पण विराटने अजिंक्यला संघात स्थान दिल्याचे जाहीर केले. अजिंक्य रहाणेवर टीम इंडिया व्यवस्थापन अजूनही विश्वास दाखवत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केलं. पण काही चाहत्यांना ही गोष्ट रूचली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर रहाणेबद्दल भन्नाट विनोदी मीम्स आणि व्हिडीओ व्हायरल झाले.

अजिंक्य रहाणेच्या निवडीवर काही माजी खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने रहाणेवर विश्वास दाखवला आहे. रहाणेला त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याची आणखी संधी मिळाली आहे, अशा आशयाची ट्वीट्स काहींनी केली. तर काहींनी रहाणे टिंगलटवाळीही केली. रहाणेला संघात स्थान दिले तर याचा अर्थ त्याच्याकडे निवड समिती सदस्यांचे काही खास व्हिडीओ आहेत, असं ट्वीट एका युजरने केलं. तर काहींनी तर अजिंक्य रहाणे बरोबर पुजारालाही टीकेचं लक्ष्य केलं. पाहा त्यापैकी काही निवडक ट्वीट्स...

दरम्यान, भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंड विरूद्ध कसोटी मालिका खेळली. त्या मालिकेत श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी केली होती. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं होतं. तसेच, हनुमा विहारीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सामना वाचवण्यासाठी पाचव्या दिवशी अख्खा दिवस खेळून काढला होता. त्या दोघांपैकी एकाला रहाणेच्या जागी संघात स्थान मिळायला हवं असा सूर सोशल मीडियावर काही दिवसांपासून दिसत होता. पण अखेर रहाणेलाच संघात स्थान देण्यात आले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाअजिंक्य रहाणेमिम्सभारतीय क्रिकेट संघ
Open in App