India vs Pakistan, Virat Kohli Babar Azam: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या दोघांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सध्याच्या घडीला या दोघांनाही जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. विराट कोहली गेली कित्येक वर्षे तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असून चांगली कामगिरी करत आहे. तसेच, बाबर आझम देखील खूप कमी कालावधीत पाकिस्तानचा आणि जागतिक क्रिकेटमधील सुपरस्टार फलंदाज बनला आहे. या दोन खेळाडूंची चाहत्यांकडून वारंवार तुलना केली जाते.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यानेदेखील बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यातील तुलनेबाबत मत व्यक्त केले. इएसपीएनक्रिकइन्फोच्या मुलाखतीत आफ्रिदीला विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यापैकी सर्वोत्तम किंवा तुला आवडणारा फलंदाज कोणता, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर शाहिन आफ्रिदीने अतिशय झकास उत्तर दिले. 'मला दोन्ही फलंदाज आवडतात', असं तो म्हणाला. यासोबतच, आफ्रिदी म्हणाला की आमच्या संघातील मोहम्मद रिझवान हा इंग्लंडच्या जो रूटपेक्षा चांगला फलंदाज असल्याचा दावा केला. तसेच, पाकिस्तान सुपर लीग टी२० स्पर्धा ही IPL पेक्षा सरस आहे असेही आफ्रिदी म्हणााला.
दरम्यान, शाहिन शाह आफ्रिदी गेल्या काही महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत आहे. २०२२ काउंटी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी तो इंग्लंडलाही गेला होता. तिथे त्याने मिडलसेक्सचे प्रतिनिधित्व केले. शाहीन आफ्रिदीला ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर २०२१ साठी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी प्रदान करण्यात आली होती. २०२१ मध्ये आफ्रिदीने ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २२ च्या सरासरीने ७८ बळी घेतले होते. २०२१ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या विजयात त्याने तीन विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Web Title: India vs Pakistan Virat Kohli or Babar Azam who is the best see what Shaheen Shah Afridi said
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.