India Women vs Pakistan Women: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना हा श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फतिमा सना हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस वेळी पुन्हा एकदा आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सामन्यावेळी जे दिसलं तेच चित्र पाहायला मिळाले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि फतिमा सना यांनी हस्तांदोलन करणं टाळलं. एवढेच नाही तर दोघींनी एकमेकींशी संवादही साधला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कप स्पर्धेत ठरलं तेच हरमनप्रीत कौरनंही केलं
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, असा सूर उमटला. त्यानंतरही ICC आणि आशिया कप सारख्या बहुपक्षीय स्पर्धेतून माघार घेता येणार नाही, असे म्हणत बीसीसीआयने पाक विरुद्ध खेळण्याला तयारी दर्शवली. पण या दरम्यान भारतीय संघानं 'नो हँडशेक' च्या माध्यमातून पाकिस्तान विरुद्ध खेळतानाही त्यांच्यावर बहिष्काराचा फॉर्म्युला आजमावला. आशिया कप स्पर्धेत हा मुद्दा गाजला. पण भारतीय संघ शेवटपर्यंत आपल्या भूमिकावर ठाम राहिला. आता महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही तीच गोष्ट पुढे नेण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
टीम इंडिया एका बदलासह उतरली मैदानात
पाकिस्तान विरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. अमनजोत कौरच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये रेणुका सिंह ठाकूर हिला संधी देण्यात आलीये. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. त्यात पाकला एकदाही जिंकता आलेले नाही. कोलंबो येथील मैदानात आपला दबदबा कायम ठेवत टीम इंडिया स्पर्धेतील दुसरा अन् पाक विरुद्ध १२ विजय नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Web Title: India vs Pakistan No Handshake In Womens World Cup Harmanpreet Kaur Fatima Sana Stick To Business
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.