Join us

India vs Pakistan, Asia Cup: पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ! भारताविरूद्ध सामना जिंकून देणारा खेळाडू रूग्णालयात दाखल

आशिया चषकात रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 14:46 IST

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) पाकिस्तानच्या संघाने भारताविरूद्ध आपला पहिला विजय मिळवून सुपर-4 मधील दुसरा सामना जिंकला आहे. रविवारी झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्यात पाकिस्तानने 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने जोरदार कमबॅक करून सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला मात्र विजय मिळवण्यात अपयश आले. शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानने 1 चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. मात्र आता पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

काल झालेल्या सामन्यात मोहम्मद रिझवानला दुखापत झाली होती. रिझवानचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. मात्र दुखापत किती गंभीर आहे आणि ठिक व्हायला किती वेळ लागेल हे अद्याप समोर आले नाही. परंतु पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताच्या डावाच्या 15 व्या षटकात रिझवानला दुखापत झाली होती. रिझवानने उंच उडी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे काही वेळ सामना थांबवावा लागला होता. उपचार केल्यानंतर रिझवानने सामना खेळला आणि शानदार अर्धशतक झळकावले.

MRI साठी दुबईतील रूग्णालयात दाखलसामना झाल्यानंतर मोहम्मद रिझवानला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे एमआरआय स्कॅन करण्यात आला. याचा रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. याबाबतची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दिली आहे. रिझवानची दुखापत किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी सामना होताच त्याला रूग्णालयात नेण्यात आले असे पीसीबीने म्हटले. 

 

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानटी-20 क्रिकेट
Open in App