India vs Pakistan Live Update Marathi : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शुबमन गिलने ( Shubman Gill) पाकिस्तानी गोलंदाजांसाठी कौतुकाचा पूल बांधला होता. अशा गोलंदाजांचा आम्हाला नेहमी सामना करायला मिळत नाही आणि त्यामुळे सामन्यात अडखळतो, असे तो अप्रत्यक्षपणे म्हणाला होता. आता यामुळे पाकिस्तानी गोलंदाज जरा हवेतच गेले होते आणि आज प्रत्यक्षात भारतीय फलंदाजांनी त्यांना जमिनीवर आणले. रोहित शर्माचा पहिल्याच षटकातील षटकार अन् त्यानंतर शुबमनचे वैविध्यपूर्ण फटके, भारतीय चाहत्यांना आनंदीत करणारे ठरले.
Video : रोहित शर्माने पहिल्याच षटकात आफ्रिदीचे वाभाडे काढले; जे कधीच कुणाला नव्हते जमले
बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) दुखापतीमुळे आज बाहेर बसावे लागले. मोहम्मद शमीलाही विश्रांती दिली गेलीय. शाहीन आफ्रिदी VS रोहीत शर्मा यांच्यातला सामना पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. रोहितने ५ चेंडू खेळून काढले अन् सहावा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमापार पाठवला. शाहीनच्या पहिल्याच षटकात वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही फलंदाजाने षटकार खेचला नव्हता. तो पराक्रम आज रोहितने केला. रोहित व शुबमन गिल दोघांनीही चांगली फटकेबाजी केली आणि पाकिस्तानच्या दोन्ही गोलंदाजांना हतबल बनवले.