Join us

India vs Pakistan Live Scorecard : १,२,३ माघारी! भारतीय संघाचे १० षटकांत कंबरडे मोडले; पाकिस्तानी गोलंदाज पडले भारी, Video

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी म्हणून आशिया चषक स्पर्धेकडे पाहिले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:42 IST

Open in App

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी म्हणून आशिया चषक स्पर्धेकडे पाहिले जात आहे. भारतीय संघाला १० वर्ष आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही आणि यावेळी घरच्या मैदानावर हा दुष्काळ संपवण्याचा निर्धार आहे. पण, भारतीय संघाची तयारी कमकुवत असल्याचे आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात आतापर्यंत पाहायला मिळाले. रोहित शर्मा, विराट कोहलीश्रेयस अय्यर हे पहिल्या १० षटकांत माघारी परतले. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांनी भारतीय संघाचे ढाबे दणाणून सोडले आहेत. India vs Pakistan Live Match 

शाहिन आफ्रिदीने सापळा रचला, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा 'दांडा' उडवला; Video

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने ( Rohit Sharma) स्क्वेअर लेगच्या दिशेने दोन चौकार खेचून चाहत्यांना आनंदीत केले. पावसामुळे २०-२५ मिनिटे सामना थांबवावा लागला. पावसाच्या विश्रांतीनंतर मॅच पुन्हा सुरू झाली आणि त्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने ( Shaheen Afridi) सापळा रचून हिटमॅनची दांडी गुल केली. शाहिनची गोलंदाजी पाहून विराट डग आऊटमध्ये असतानाच आश्चर्यचकित झाला होता. प्रत्यक्षातही पाकिस्तानी गोलंदाजाने त्य़ाला चकित केले. शाहिनच्या चेंडूने बॅटची किनाय घेत यष्टिंचा वेध घेतला. रोहित ११ व विराट २ धावा करून माघारी परतल्याने भारताची अवस्था २ बाद २७ अशी दयनीय झालीय.   India vs Pakistan Live Asia Cup Match

शाहिन भेदक माऱ्याने भारतीय फलंदाजांना चाचपडायला लावताना दिसला. शुबमन गिलला टाकलेला चेंडू बॅटला चकवून यष्टिंच्या एकदम जवळून गेला. भारतीय चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. गिल चाचपडत खेळताना दिसला, तर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरचा भर पटापट धावा करण्यावर दिसला. ८ चेंडूंत १४ धावा करणाऱ्या श्रेयसचा काटा हॅरीस रौफने काढला. मिड विकेटवर उभ्या असलेल्या फखर झमानने अप्रतिम झेल घेत श्रेयसला माघारी पाठवले. भारताला पहिल्या १० षटकांत ४८ धावांवर तीन धक्के बसले. पावसाच्या हजेरीमुळे पुन्हा सामना थांबवण्यात आला. ११.२ षटकांत भारताच्या ३ बाद ५१ धावा झाल्या आहेत. ( India vs Pakistan Live  Scorecard )  

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माविराट कोहलीश्रेयस अय्यर
Open in App