India vs Oman Asia Cup 2025 IND beat OMA by 21 runs in Abu Dhabi : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ओमानच्या संघाने टी-२० वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाविरुद्ध दिमाखदार खेळ दाखवला. भारतीय संघाने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना आमीर कलीम ६४ (४६) आणि हमीद मिर्झा (Hammad Mirza) ५१ (३३) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ४ विकेट्सच्या मोबदल्यात १६७ धावा केल्या. नंबर वन टीमसमोर फक्त २१ धावांनी सामना गमावल्यामुळे ओमानचा संघ 'हार के जीतने वाला' बाजीगर ठरला. भारतीय संघाने या सामन्यात बरेच प्रयोग केले. पण आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं ‘सावधान टीम इंडिया’ असा शोच दाखवून दिलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ना बॅटिंगमध्ये धमक ना बॉलिंगमध्ये धार, टीम इंडिया खूपच रिलॅक्स अंदाजात खेळली, पण...
भारतीय टी संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीतील अव्वलस्थानी असणारा संघ आहे. आयसीसीच्या रँकिंगमध्ये २० व्या स्थानावर असलेल्या ओमानच्या संघाने काही वेळासाठी टीम इंडिला टेन्शन दिले. भारतीय संघाने बॅटिंगसह बॉलिंगमध्ये अनेक प्रयोग केले. कर्णधार सूर्यकुमार यादवशिवाय सर्वांनी बॅटिंग करूनही संघाने निर्धारित २० षटकात १८८ धावा केल्या. बॉलिंगमध्येही धार नाही दिसली. जर हार्दिक पाांड्याने ओमानचा विक्रमी अर्धशतकवीर आमीर कलीम याचा अप्रतिम झेल टिपला नसता तर मॅच हातून निसटली असती, असे चित्र निर्माण झाले होते