Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ 2nd ODI : KL राहुलचं नाबाद शतक! टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर सेट केलं २८५ धावांच टार्गेट

संघ अडचणीत असताना लोकेश राहुल याने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:23 IST

Open in App

India vs New Zealand, 2nd ODI : राजकोटच्या मैदानात केएल राहुलच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघासमोर २८५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.  न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधार ब्रेसवेलचा निर्णय सार्थ ठरवला. संघ अडचणीत असताना लोकेश राहुल याने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. पाचव्या क्रमांकावर मैदानात आल्यावर सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गियर बदलून फलंदाजी करत त्याने निर्धारित ५० षटकात संघाच्या धावफलकावर ७ विकेट्सच्या मोबदल्यात २८४ धावा लावल्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शुभमन गिलच अर्धशतक, रोहितसह कोहली आणि अय्यर स्वस्तात आटोपले

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने रोहित शर्माच्या रुपात ७० धावांवर पहिली विकेट गमावली. हिटमॅन ३८ चेंडूचा सामना करून २४ धावांवर बाद झाला. कर्णधार शुभमन गिलनं अर्धशतकाला गवसणी घातली. पण संघाच्या धावफलकावर १०० धावा लागण्याआधीच त्यानेही विकेट गमावली. गिलनं ५३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली.  श्रेयस अय्यरनेही १७ चेंडूचा सामना करून ८ धावांवर आपली विकेट गमावली. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली अवघ्या २३ धावा करून माघारी फिरला. भारतीय संघाने ११८ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. 

KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

KL राहुलचं नाबाद शतक, जड्डूसह नितीश कुमार रेड्डीसोबत  अर्धशतकी भागीदारी

संघ अडचणीत असताना लोकेश राहुलनं रवींद्र जडेजाच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. दोघांनी ८८ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. ही या सामन्यातील कोणत्याही विकेट्समधील सर्वोच्च भागीदारी देखील ठरली. जड्डू ४४ चेंडूत २७ धावा करून बाद झाल्यावर लोकेश राहुलनं युवा अष्टपैलू  नितीश कुमार रेड्डीसह सहाव्या विकेटसाठी ४९ चेंडूत ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.  नितीश कुमार रेड्डीनं २१ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. लोकेश राहुलनं शेवटपर्यंत मैदानात थांबत ९२ चेंडूत ११२ धावांसह भारतीय संघाच्या धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या लावली. न्यूझीलंडच्या संघाकडून क्रिस्टियन क्लर्क याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय झॅक फॉल्केस,जयडेन लेनक्स आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : KL Rahul's Century Sets 285 Target for New Zealand.

Web Summary : KL Rahul's unbeaten century propelled India to 284/7 against New Zealand in the second ODI. After New Zealand opted to bowl first and dismissed early Indian batsmen, Rahul's composed innings rescued the team, setting a competitive target.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडलोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयशुभमन गिलरोहित शर्माविराट कोहलीश्रेयस अय्यर