IND vs NZ : टीम इंडियाचा 'प्रयोग' फसला! संजूचा पुन्हा फ्लॉप शो अन् मालिका गमावलेल्या न्यूझीलंडने मारली बाजी

२१६ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियावर ५० धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 23:08 IST2026-01-28T23:05:07+5:302026-01-28T23:08:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs New Zealand 4th T20I Shivam Dube's Heroic Knock In Vain As NZ Outplay India By 50 Runs Sanju Samson Flop Show | IND vs NZ : टीम इंडियाचा 'प्रयोग' फसला! संजूचा पुन्हा फ्लॉप शो अन् मालिका गमावलेल्या न्यूझीलंडने मारली बाजी

IND vs NZ : टीम इंडियाचा 'प्रयोग' फसला! संजूचा पुन्हा फ्लॉप शो अन् मालिका गमावलेल्या न्यूझीलंडने मारली बाजी

India vs New Zealand 4th T20I : विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला रोखून दाखवत पाच सामन्यांची मालिका गमावल्यानंतर अखेर पहिला विजय मिळवला. भारतीय संघाने या सामन्यात पहिल्या तीन सामन्याच्या तुलनेत नवा प्रयोग केल्याचे पाहायला मिळाले. इशान किशन दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्या जागी बॅटरला न घेता अर्शदीप सिंगला संधी मिळाली. अतिरिक्त फलंदाज खेळवण्याऐवजी टीम इंडियाने पाच गोलंदाजासह मैदानात उतरण्याचा प्रयोग आजमवला. जो सपशेल अपयशी ठरला. २१६ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियावर ५० धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली. संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. आगामी सामन्यासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याला संघात कायम ठेवणं भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

 

न्यूझीलंडच्या संघाने ठेवलं होतं २१६ धावांचे टार्गेट

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रमुख पाच गोलंदाजासह मैदानात उतरलेल्या टीम इंडियासमोर दमदार फलंदाजीचा नजराणा पेश केला. न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २१५ धावा करत टीम इंडियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमधील आपली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. न्यूझीलंडने दिलेल्या २१६ धावांचा पाठलाग करताना भारतीय आघाडीची फळी कोलमडली. शिवम दुबेनं जोर लावला. पण त्याची विकेट पडताच न्यूझीलंडच्या मालिकेतील पहिल्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

IND vs NZ : रिंकू सिंहची कमाल! अजिंक्य रहाणेनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय

शिवम दुबेची धमाकेदार खेळी, पण...

टिम सिफर्टचे दमदार अर्धशतकासह ६२ (३६)  डेवॉन कॉन्वे ४४ (२३) आणि डॅरिल मिचेल ३९ (१८) यांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २१३५ धावा करत टीम इंडियासमोर २१६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाला.  सूर्यकुमार याव ८ चेंडूत ८ धावा करून परतल्यावर  संजू सॅमसनही पुन्हा अपयशी ठरला.  त्याने १५ चेंडूत २४ धावांवर आपली विकेट फेकली. रिंकू सिंह याने ३० चेंडूत केलेल्या ३९ धावांच्या खेळीनंतर शिवम दुबेची बॅट तळपली. त्याने २३ चेंडूत २८२ च्या स्ट्राइक रेटनं ६५ धावांची खेळी केली. पण हर्षित राणाने थेट गोलंदाजाच्या दिशेने मारलेला चेंडूनं  नॉन स्ट्राइक एन्डवर तो रनआउट झाला अन् न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला १८.४ षटकात १६५ धावांवर रोखत मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यानंतर भारतीय संघ चौथ्या सामन्यात आजमावलेला प्रयोग पुढे कायम ठेवणार आहे, असेच या निकालावरून स्पष्ट होते. दुसरीकडे मालिका गमावलेल्या न्यूझीलंडला वर्ल्ड कप स्पर्धेआधी या विजयाने मोठा दिलासाच मिळाला आहे. 

Web Title : भारत का प्रयोग विफल; न्यूजीलैंड जीता, संजू सैमसन का संघर्ष जारी।

Web Summary : पांच गेंदबाजों के साथ भारत का प्रयोग विफल रहा क्योंकि न्यूजीलैंड ने श्रृंखला हारने के बाद जीत हासिल की। संजू सैमसन की विफलता ने टी20 विश्व कप के लिए टीम में उनकी जगह पर सवाल खड़े कर दिए, भारत 216 रनों का पीछा करते हुए 50 रनों से हार गया।

Web Title : India's Experiment Fails; New Zealand Wins, Sanju Samson's Struggle Continues.

Web Summary : India's experiment with five bowlers backfired as New Zealand secured a victory after losing the series. Sanju Samson's failure raises questions about his place in the team for the T20 World Cup after India lost by 50 runs chasing 216.