Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ 2nd T20I Live Streaming : टीम इंडिया दबदबा कायम ठेवणार की, न्यूझीलंड बरोबरीचा डाव साधणार?

IND vs NZ यांच्यातील सामना Live Streaming च्या माध्यमातून कसा पाहता येईल? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:00 IST

Open in App

India vs New Zealand 2nd T20I Live Cricket Streaming and Telecast : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेआधी भारत-न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. नागपूरच्या मैदानात भारतीय संघाने या मालिकेत विजयी सलामी दिली. आता रायपूरमध्ये टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसऱ्या बाजूला मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील संघ पटवार करून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी जोर लावेल. इथं एक नजर टाकुयात कुठ अन् कधी रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना? Live Streaming च्या माध्यमातून IND vs NZ सामना कसा पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा, रिंकू सिंग यांच्यासह कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली होती. गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्तीचा जलवा पाहायला मिळाला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराह आपल्या गोलंदाजीची छाप सोडणार का? तेही पाहण्याजोगे असेल. 

टी२० मध्ये अजून कुणाचे ३०० षटकारही नाहीत; पण भज्जी म्हणतो, 'हा' खेळाडू १००० षटकार ठोकणार! कुठं अन् कधी रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना?

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना शुक्रवारी, २३ जानेवारी २०२६ रोजी खेळवण्यात येणार आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. सायंकाळी ७ वाजता सामन्यातील पहिला चेंडू टाकला जाईल. याआधी अर्धातास अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. 

 IND vs NZ लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट कसे पाहाल?

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा T20 सामना JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल. टेलिव्हिजनवर Star Sports नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे. 

भारतीय संघ संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, ईशान किशन, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड संघ  टिम रॉबिन्सन, डेवॉनन कॉन्वे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, इश सोढी, जेकब डफी, मॅट हेन्री, बेव्हन जेकब्स, क्रिस्टियन क्लर्क, झॅकेरी फॉल्क्स.

English
हिंदी सारांश
Web Title : India vs New Zealand T20I: Aiming for series lead in Raipur.

Web Summary : India faces New Zealand in the 2nd T20I in Raipur, seeking a series-clinching victory. After winning the first match, Team India aims to continue its dominance, while New Zealand seeks to level the series. The match will be broadcast on Star Sports and JioHotstar.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय