टी२० मध्ये अजून कुणाचे ३०० षटकारही नाहीत; पण भज्जी म्हणतो, 'हा' खेळाडू १००० षटकार ठोकणार!

Most Sixes in T20I: आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अजून कोणत्याही खेळाडूला ३०० षटकारांचा टप्पा गाठता आली. परंतु, हरभजनसिंह यांच्या मते, भारतीय संघात असा एक खेळाडू आहे, जो १००० षटकार मारू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:20 IST2026-01-23T14:19:41+5:302026-01-23T14:20:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Abhishek Sharma Will Hit 1000 Sixes in T20 International Cricket, Harbhajan Singh Bold Prediction | टी२० मध्ये अजून कुणाचे ३०० षटकारही नाहीत; पण भज्जी म्हणतो, 'हा' खेळाडू १००० षटकार ठोकणार!

टी२० मध्ये अजून कुणाचे ३०० षटकारही नाहीत; पण भज्जी म्हणतो, 'हा' खेळाडू १००० षटकार ठोकणार!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने युवा सलामीवीर अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर फिदा होऊन एक खळबळजनक भाकीत केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेकची स्फोटक खेळी पाहिल्यानंतर भज्जी म्हणाला की, जर अभिषेकला रोहित शर्मा आणि विराट कोहली इतके सामने खेळायला मिळाले, तर तो टी-२० क्रिकेटमध्ये १००० षटकार मारण्याचा विक्रम करू शकतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या काही चेंडूत ८४ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल ८ उत्तुंग षटकार ठोकले. हरभजनच्या मते, अभिषेकची फलंदाजी करण्याची पद्धत आणि त्याची मानसिकता त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. "तो स्वतःच्या शतकाचा विचार करत नाही, तर संघाला वेगवान सुरुवात करून देण्यावर त्याचा भर असतो. गोलंदाजांकडे त्याच्या फटक्यांचे कोणतेही उत्तर नाही," असे भज्जीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले.  

खेळाडूडावषटकार
रोहित शर्मा१५१२०५
सूर्यकुमार यादव९४१५६
विराट कोहली११७१२४
हार्दिक पंड्या९८१०७
केएल राहुल६८९९
अभिषेक शर्मा३३८१

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत सध्या रोहित शर्मा अव्वल आहे. मात्र, अभिषेक ज्या वेगाने धावा करतोय, ते पाहता तो सर्वांना मागे टाकेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

Web Title : हरभजन सिंह की भविष्यवाणी, अभिषेक शर्मा टी20 में 1000 छक्के मारेंगे

Web Summary : हरभजन सिंह का मानना है कि अभिषेक शर्मा को पर्याप्त अवसर मिलने पर वह टी20 में 1000 छक्के मार सकते हैं। सिंह शर्मा की विस्फोटक बल्लेबाजी से प्रभावित थे, खासकर न्यूजीलैंड के खिलाफ उनके आठ छक्के। शर्मा टीम के लिए तेज शुरुआत को प्राथमिकता देते हैं।

Web Title : Harbhajan Singh Predicts Abhishek Sharma Will Hit 1000 T20 Sixes

Web Summary : Harbhajan Singh believes Abhishek Sharma could hit 1000 T20 sixes if he gets enough opportunities. Singh was impressed by Sharma's explosive batting, especially his eight sixes against New Zealand. Sharma prioritizes a fast start for the team.