T20 World Cup 2026 : 'कुंफू' पांड्याची 'पॉवर'; पठ्ठ्यानं मारला डोळ्यांचं पारणं फेडणारा विक्रमी षटकार (VIDEO)

ईशान किशनच्या फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 23:45 IST2026-02-12T23:38:02+5:302026-02-12T23:45:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs Namibia 18th Match Hardik Pandya Hit 109 M Six Against Namibia Longest Six In ICC T20 World Cup 2026 Beating Shivam Dube Same Match Watch Video | T20 World Cup 2026 : 'कुंफू' पांड्याची 'पॉवर'; पठ्ठ्यानं मारला डोळ्यांचं पारणं फेडणारा विक्रमी षटकार (VIDEO)

T20 World Cup 2026 : 'कुंफू' पांड्याची 'पॉवर'; पठ्ठ्यानं मारला डोळ्यांचं पारणं फेडणारा विक्रमी षटकार (VIDEO)

 Hardik Pandya Hit Longest Six In ICC T20 World Cup  Against Namibia :  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करुन दाखवली. फलंदाजीवेळी फक्त २८ चेंडूत ५२ धावांची धमाकेदार खेळी केल्यावर त्याने गोलंदाजीत २ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ४ षटकार पाहायला मिळाले. यात त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार मारला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 हार्दिक पांड्याच्या बॅटमधून निघाला स्पर्धेतील सर्वात लांब षटकार

हार्दिक पांड्या भारताच्या डावातील १५व्या षटकात फलंदाजीला आला. बर्नार्ड शोल्ट्झ यांच्या गोलंदाजीवर त्याने १०९ मीटर लांबीचा गगनचुंबी षटकार लगावला. १५व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लान्ग ऑफच्या दिशेने मारलेला हा षटकार स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठरला. त्याने मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिवम दुबेने मारलेला षटकार १०७ मीटर लांब अंतरावर पडला होता. पण काही वेळातच हार्दिकने १०९ मीटर अंतर लांब षटकार मारत  त्याला मागे टाकले.  दुबेने डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार ठोकला होता.

T20 World Cup 2026 : टीम इंडियाचा जलद 'सेंच्युरी'चा पराक्रम! नामिबिया विरुद्ध 'द्विशतक' झालं, पण...

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सर्वात लांब षटकार

  • १०९ मीटर – हार्दिक पांड्या (भारत)
  • १०७ मीटर – शिवम दुबे (भारत)
  • १०० मीटर – कमिंदू मेंडिस (श्रीलंका)
  • ९८ मीटर – नूर अहमद (अफगाणिस्तान)
  • ९८ मीटर – कॅमेरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया)
     

ईशान किशनच्या फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याचा धमाका

नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये ईशान किशनचा जलवा पाहायला मिळाला. त्याने ६१ धावांची धमाकेदार खेळी केली. त्यानंतर लवकर फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हार्दिक पांड्याने अर्धशतकाने मैफिल लुटली. तो मैदानात असताना भारतीय संघ धावफलकावर २४०-५० धावांचा पल्ला सहज गाठेल, असे वाटत होते. पण नामिबियाचा कर्णधार  गेर्हार्ड एरॅस्मसने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. पण बाद होण्याआधी त्याने आपली भूमिका अगदी चोख बजावली होती.  
 

Web Title : हार्दिक पांड्या का पावर हिटिंग, विशाल छक्के से टी20 विश्व कप में रिकॉर्ड

Web Summary : हार्दिक पांड्या ने नामीबिया के खिलाफ 28 गेंदों में 52 रनों की विस्फोटक पारी खेली, जिसमें 109 मीटर का छक्का शामिल था, जो टी20 विश्व कप 2026 का सबसे लंबा छक्का रहा। उन्होंने 2 विकेट भी लिए, जिससे भारत की जीत में महत्वपूर्ण योगदान दिया।

Web Title : Hardik Pandya's power hitting sets T20 World Cup record with massive six.

Web Summary : Hardik Pandya's explosive 52 off 28 balls, including a 109-meter six against Namibia, marked the longest of the T20 World Cup 2026. He also took 2 wickets, contributing significantly to India's victory.