Join us

IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल

विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे टीम इंडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:00 IST

Open in App

India vs England Test Series Gautam Gambhir Shubman Gill Press Conference : आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज आहे. या दौऱ्यात भारत  आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.  इंग्लंडला दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल आणि संघाचे कोच गौतम गंभीर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शुबमन गिल आणि गंभीर यांनी इंग्लंड दौऱ्यावर संघ चांगली कामगिरी करेल, अशा विश्वास व्यक्त केला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!रोहित-विराटसंदर्भातील प्रश्न अन्  कॅप्टन शुबमन गिलचं उत्तर 

इंग्लंड दौऱ्याआधी  विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माच्या जागी बीसीसीआय निवडकर्त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी ही शुबमन गिलवर सोपवली आहे. मध्यफळीतील मोठा आधार असलेल्या विराट कोहलीची उणीव भरून काढण्याचे चॅलेंजही गिलवर असेल.  त्यामुळे नव्या कॅप्टनला या दोन दिग्गजांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शुबमन गिल म्हणाला की, एवढ्या मोठ्या दिग्गजांची उणीव भरून काढणं कठीण आहे. पण त्यांच्या अनुपस्थितीचा कोणताही अतिरिक्त दबाव आमच्यावर नाही. मला माझ्या संघावर भरवसा आहे.  

टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरसह स्वत:च्या इंग्लंडमधील आकडेवारीवरही केलं भाष्य 

बॅटिंग ऑर्डरसंदर्भात अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात करण्याआधी आम्ही १० दिवसांच्या सराव शिबिरात भाग घेऊ.एक इंन्ट्रा स्क्वॉज मॅच खेळल्यानंतर बॅटींग ऑर्डरमधील कॉम्बिनेशनचा विचार करू असेही तो म्हणाला आहे. शुबमन गिल हा प्रतिभावंत खेळाडू आहे. पण इंग्लंडमध्ये त्याची आकडेवारी फारशी चांगली नाही. यामुद्यावरुनही त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, मी आकड्यावर फोकस करण्यापेक्षा चांगल्या कामगिरीसह पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५शुभमन गिलगौतम गंभीर