Join us

India vs England Test: दारुण पराभवानंतरही भारतीय संघ अव्वल

या मालिकेपूर्वी भारताचे 125 गुण होते. या मालिकेत पराभव झाल्यामुळे भारताचे 115 गुण झाले आहेत, पण तरीही भारत अव्वल स्थानावर कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 18:35 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही भारतीय संघ अव्वल राहिला आहे तो आयसीसीच्या क्रमवारीमध्ये. 

दुबई, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही भारतीय संघ अव्वल राहिला आहे तो आयसीसीच्या क्रमवारीमध्ये. 

आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीमध्ये भारताचा संघ अजूनही अव्वल स्थानावर कायम आहे. या मालिकेपूर्वी भारताचे 125 गुण होते. या मालिकेत पराभव झाल्यामुळे भारताचे 115 गुण झाले आहेत, पण तरीही भारत अव्वल स्थानावर कायम आहे. कारण या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचे 106 गुण आहेत. हे दोन्ही संघ भारतापेक्षा 9 गुणांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडच्या संघाने भारताविरुद्धच्या मालिकेत 4-1 असा दमदार विजय मिळवला. या विजयानंतर इंग्लंडने 105 गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचे 97 गुण होते, त्यावेळी ते पाचव्या स्थानावर होते. पण आता त्यांनी न्यूझीलंडला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआयसीसीआॅस्ट्रेलियाद. आफ्रिका