India vs England T20I Series : भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय टी-२० मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. तीन वर्षांनी या मैदानात आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होत आहे. इथं एक नजर टाकुयात भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्यांचा आनंद चाहत्यांना कधी, अन् कसा घेता येईल, यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी, कुठं अन् कसा घेता येईल भारत-इंग्लंड टी-२० सामन्यांचा आनंद
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सर्वच्या सर्व सामन्यांचे थेट प्रेक्षपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून करण्यात येईल. क्रिकेट चाहते टेलिव्हिजनवरील स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर भारत-इंग्लंड टी-२० सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय लाइव स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टारवरही उपलब्ध असेल.
किती वाजता रंगणार हे सामने?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होतील. मॅच सुरु होण्याच्या अर्धातास आधी दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-२० सामना २२ जानेवारी २०२५, कोलकाता (ईडन गार्डन्स)
- भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा टी-२० सामना २५ जानेवारी २०२५, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)
- भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी-२० सामना २८ जानेवारी २०२५, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी-२० सामना ३१ जानेवारी २०२५, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा टी-२० सामना ०२ फेब्रुवारी २०२५, मुंबई (वानखेडे स्टेडियम)
टी-२० मालिकेसाठी भारत-इंग्लंड दोन्ही संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीशकुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई , वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर),
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, जॅकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लायम लिविंगस्टोन, आदिल राशिद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वुड.