IND W vs ENG W Women’s ODI World Cup 2025 Match LIVE Streaming And Head To Head Stats And Records : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील २० व्या सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणारा सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी खूपच महत्त्वपूर्ण असेल. हा सामना जिंकून सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज टीम इंडियासमोर असेल. इथं एक नजर टाकुयात भारत-इंग्लंड यांच्यात रंगणाऱ्या सामन्यातील लाइव्ह स्ट्रेमिंगसह दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्डवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना कधी अन् कुठ रंगणार?
रविवारी, १९ ऑक्टोबरला भारत-इंग्लंड यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेतील २० वा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंदूर येथील होळकर स्टेडियमवर रंगणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाने ४ पैकी २ सामन्यातील विजयासह ४ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. मागील दोन सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियासमोर या सामन्यात पराभवाची हॅटट्रिक रोखत सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज असेल.
कुठं पाहता येईल भारत-इंग्लंड यांच्यातील सामना?
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क हे स्टार नेटवर्ककडे आहेत. स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर क्रिकेट चाहत्यांना या सामन्यांचा आनंद घेता येईल. याशिवाय जिओ स्टार अॅपवरही या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रेमिंग उपलब्ध असेल.
भारत इंग्लंड यांच्यातील वनडेतील हेड टू हेड रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारत इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ७९ सामने झाले आहेत. २ अनिर्णित लढतीशिवाय या दरम्यान इंग्लंडचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. आकडेवारी इंग्लंडच्या बाजूनं असली तरी टीम इंडियात बाजी पलटण्याची ताकद आहे. या सामन्यात भारताची उप कर्णधार स्मृती मानधनाकडून पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल. याशिवाय भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर धावांचा संघर्ष संपवून संघासाठी महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
- दोन्ही संघात झालेले ODI सामने -७९
- भारतीय महिला संघ- ३६ विजय
- इंग्लंड महिला संघ - ४१ विजय
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघातील रेकॉर्ड
- भारतीय महिला संघ- ४ विजय
- इंग्लंड महिला संघ - ८ विजय
Web Summary : India Women face England in a crucial World Cup match in Indore. A victory is essential for securing a spot in the semifinals. Focus will be on Smriti Mandhana and Harmanpreet Kaur to deliver strong performances against England, who hold a favorable head-to-head record.
Web Summary : भारत महिला टीम का इंदौर में इंग्लैंड के साथ महत्वपूर्ण विश्व कप मुकाबला। सेमीफाइनल में जगह बनाने के लिए जीत जरूरी। स्मृति मंधाना और हरमनप्रीत कौर पर इंग्लैंड के खिलाफ दमदार प्रदर्शन करने का दारोमदार, जिनका हेड-टू-हेड रिकॉर्ड बेहतर है।