India vs England Live Cricket Streaming T20 World Cup 2026 2nd Semi Final : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत-इंग्लंड यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. सलग तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत हे दोन्ही संघ समोरासमोर येत आहे.
कमालीचा योगायोग पुन्हा जुळून येणार?
२०२२ मध्ये अॅडलेड येथे एलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताला १० विकेट्सनी पराभूत केले होते, तर २०२४ मध्ये भारताने पराभवाची परतफेड करत जेतेपदासह नवा इतिहास रचला होता. मागील दोन्ही वेळा उपांत्य फेरीत विजय मिळवणाऱ्या संघाने ट्रॉफी उंचावल्याचा इतिहास आहे. याची पुनरावृत्ती पुन्हा पाहायला मिळणार का? त्याचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल. इथं नजर टाकुयात कुठं अन् कसा पाहता येईल हा सामना? दोन्ही संघातील कोणत्या खेळाडूवर असतील सर्वांच्या नजरा यासंदर्भातील खास स्टोरी
Finn Allen Fastest Century : फक्त ३३ चेंडूत शतक! फिन ॲलनने मोडला ख्रिस गेलचा महारेकॉर्ड
अभिषेक शर्मा विरुद्ध जोफ्रा आर्चर
अभिषेक शर्मा हा भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करतो. दुसरीकडे जोफ्रा आर्चर इंग्लंडचा गोलंदाजीतील हुकमी एक्का आहे. अभिषेकनं त्याच्यासमोर एकदाही विकेट न गमावता १८४ पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटसह ६१ धावा काढल्या आहेत. हीच कामगिरी तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
गोलंदाजीत बुमराहसह वरुण चक्रवर्तीवर मोठी जबाबदारी असतील नजरा
जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडून या सामन्यात टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा असतील. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बुमराहला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा पल्ला गाठण्याचीही संधी आहे. तो हा डाव साधणार का? तेही पाहण्याजोगे असेल. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हा मागील काही सामन्यात आपल्या गोलंदाजीतील छाप सोडण्याती अपयशी ठरला आहे. पण इंग्लंडविरुद्ध मिस्ट्री स्पिनर टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. कारण त्याने जोस बटलरला ८० धावा देत ५ वेळा आणि हॅरी ब्रूकला ४५ धावा खर्च करून ३ वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.
सामना कधी अन् कुठं रंगणार?
- सामन्याची तारीख : गुरुवार, ५ मार्च २०२६
- सामन्याची वेळ : सायं. ७:०० (नाणफेक ६:३० वाजता)
- सामन्याचे ठिकाण : वानखेडे, मुंबई
कुठे पाहता येईल IND vs ENG यांच्यातील सेमीफायनलचा सामना?
- टीव्हीवर थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- ऑनलाइन स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइट
वेगवेगळ्या थिअटरमध्येही पाहता येईल सेमीचा थरार