Join us

India vs England : अजिंक्य रहाणेचा ट्रोलर्सवर पलटवार; टीम इंडियाच्या संयमी फलंदाजाची पोस्ट व्हायरल

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियानं लॉर्ड्स जिंकून १-० अशी आघाडी घेतली. लोकेश राहुल ते मोहम्मद सिराज या सर्वांनी विजयात खूप मोठा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:43 IST

Open in App

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियानं लॉर्ड्स जिंकून १-० अशी आघाडी घेतली. लोकेश राहुल ते मोहम्मद सिराज या सर्वांनी विजयात खूप मोठा वाटा उचलला. पण, खऱ्या अर्थानं अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांनी चौथ्या दिवशी शतकी भागीदारी करून भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. अजिंक्यनं ६१ धावांची खेळी केली. लॉर्ड्सवरील विजयानंतर अजिंक्यची पोस्ट चर्चेत आली आहे आणि त्यानं ट्रोलर्सनाच ट्रोल केले. 

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रिले टीमचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण...

ट्रेंट ब्रिज कसोटीत पहिल्या डावात अजिंक्यला फक्त पाच धावा करता आल्या, तर लॉर्ड्सवर पहिल्या डावात १ धावा केल्या. त्यामुळे अजिंक्यवर प्रचंड दडपण होतं अन् त्याच्यावर टीकाही होत होती. पण, त्यानं लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं १४६ चेंडूंत ६१ धावा केल्या आणि पुजारासह २९७ चेंडू खेळून काढताना १०० धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमी व  जसप्रीत बुमराह यांनी नाबाद ८९ धावा जोडून इंग्लंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांवर गडगडला अन् भारतानं १५१ धावांनी विजय मिळवला.  

कॅन्सरवर मात करून टोकियोत जिंकले पदक; पण ९३ लाखांना केला त्याचा लिलाव, कारण जाणून वाटेल अभिमान!

त्यानंतर अजिंक्यनं फोटो पोस्ट करून लिहिलं की,''जेव्हा ट्रोलर्स ट्रोल होतात, त्यावर माझी प्रतिक्रिया.'' 

अजिंक्यनं २०२१मध्ये १५ डावांत २२० धावा केल्या आहेत. या १५ डावांपैकी ६ वेळा अजिंक्य एकेरी धावेवर बाद झाला. भारत-इंग्लंड तिसरी कसोटी २५ ऑगस्टपासून लीड्सवर खेळवली जाणार आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअजिंक्य रहाणे
Open in App