Join us

IND vs ENG : तिसऱ्या वनडेत दुसरी फिफ्टी; चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला नाही तोड!

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील एक 'फिफ्टी' रन आउट झाल्यामुळे हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:08 IST

Open in App

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेतही श्रेयस अय्यरचा जलवा पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात नशीबानं मिळालेल्या संधीनंतर अर्धशतक झळकवणाऱ्या अय्यरनं तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेतही दमदार अर्धशतक झळकावले. त्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात  लागोपाठ त्याने सर्वोत्तम आणि उपयुक्त खेळीसह संघासाठी उत्तम योगदान दिले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तिसऱ्या वनडेत दुसरी फिफ्टी

अहमदाबादच्या मैदानात त्याने ६४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची खेळी केली. ६४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची खेळी केली. नागपूर वनडेत त्याच्या भात्यातून ३६ चेंडूत ५९ धावांची कडक खेळी पाहायला मिळाली होती. कटकच्या मैदानात त्याने ४७ चेंडूत ४४ धावा केल्या होत्या. या सामन्यात ६ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले होते. 

चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पर्याय

२०१९ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपासून आतापर्यंत वनडेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक सरासरीसह धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरनं या क्रमांकावर फलंदाजी करताना ३६ सामन्यात ५३.४ च्या सरासरीनं १५५१ धावा काढल्या आहेत. आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये तो एकमेव भारतीय आहे. जो या क्रमाकांवर सर्वोत्तम कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा शाई होप आघाडीवर आहे. त्याने २६ डावात ५६.७ च्या सरासरीनं १०७७ धावा केल्या आहेत. 

२०१९ वनडे वर्ल्डकप नंतर वनडेत सर्वाधिक सरासरीसह धावा करणारे आघाडीचे ५ फलंदाज

  • शाई होप (वेस्ट इंडिज) २६ डावात ५६.७ च्या सरासरीनं १०७७ धावा
  • श्रेयस अय्यर (भारत) ३६ डावात५३.४ च्या सरासरीसह १५५१ धावा
  • हॅरी टेक्टर (आयर्लंड) ४४ डावात ४८.४ च्या सरासरीसह १८३९ धावा
  • मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) ४० डावात ४६.५ च्या सरासरीसह १४८७ धावा
  • एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका) ३८ डावात ४४.९ च्या सरासरीसह १४३७ धावा

अय्यरची वनडेतील कामगिरी

श्रेयस अय्यरनं ५९ व्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळीसह वनडेत २६०० धावांचा पल्लाही पार केला. आपल्या वनडे कारकिर्दीत या स्टार बॅटरनं ४८.१८ च्या सरासरीसह १०२.४८ च्या स्ट्राइक रेटनं २६०२ धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यात पाच शतकांचाही समावेश आहे. 

टॅग्स :श्रेयस अय्यरभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारतीय क्रिकेट संघ