India vs England 2nd Test Live : १७१७ दिवसांनी केलं कमबॅक, पहिल्याच चेंडूवर झाला बाद; मोडला ७५ वर्षांपूर्वीचा विक्रम, Video 

India vs England 2021 2nd test match live cricket score : दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं ३ बाद ११९ धावा केल्या आणि आणखी ते २२५ धावांनी पिछाडीवर आहेत. रूट ४९ धावांवर खेळत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 11:36 PM2021-08-13T23:36:05+5:302021-08-13T23:36:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test : Haseeb Hameed's first ball on his return to England's Test XI, Watch Video | India vs England 2nd Test Live : १७१७ दिवसांनी केलं कमबॅक, पहिल्याच चेंडूवर झाला बाद; मोडला ७५ वर्षांपूर्वीचा विक्रम, Video 

India vs England 2nd Test Live : १७१७ दिवसांनी केलं कमबॅक, पहिल्याच चेंडूवर झाला बाद; मोडला ७५ वर्षांपूर्वीचा विक्रम, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2021 2nd test match live cricket score : भारताविरुद्धच पाच वर्षांपूर्वी कसोटीत पदार्पण करणाऱ्या हसीब हमीदनं १७१७ दिवसांनी इंग्लंडच्या संघात पुन्हा कमबॅक केले. पण, मोहम्मद सिराजच्या अप्रतिम चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. गोल्डन डकवर बाद झाल्यामुळे हमीदच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला. भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॉम सिब्ली ( ११) व हसीब हमीद ( ०) यांना सिराजनं सलग दोन चेंडूंत माघारी पाठवले. मोहम्मद सिराजनं सलग दोन चेंडूवर धक्के दिले. 

लॉर्ड्सचा दुसरा दिवस इंग्लंडनं गाजवला, जेम्स अँडरसनच्या तडाख्यानंतर रूट-बर्न्स जोडीनं इंगा दाखवला!

हसीब हमीद लॉर्ड्स कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. सलामीवीर डॉम सिब्ली माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेल्या हमीद पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. मागील ७५ वर्षांत भारताविरुद्ध इंग्लंडचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा एकही फलंदाज गोल्डन डकवर बाद झाला नाही. १९४६मध्ये डेनिस कॉम्पटन यांना लाला अमरनाथ यांनी पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना गोल्डन डकवर बाद होणारा हमीद हा पहिलाच इंग्लिश खेळाडू ठरला.  


कोण आहे हसीब हमीद?
2016साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाकडून 19 वर्षीय हसीब हमीदनं पदार्पण केलं होतं. इंग्लंडकडून सर्वात कमी वयात पदार्पण करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. अँड्य्रू स्ट्रॉस याच्या निवृत्तीनंतर अॅलेस्टर कूकसोबत हमीदला सलामीला खेळण्याची संधी मिळाली अन् त्यानं पहिल्या कसोटीत 31 व 82 अशा धावा केल्या.

त्याच्या पहिल्या कसोटी अर्धशतकानं वडील इस्मैल यांना अश्रू अनावर झाले होते. लँकशायर येथे हमीदचा जन्म झाला असला तरी त्याच्या कुटुंबीयांचे मुळ हे गुजरात आहे. त्यानं भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांत 43.80च्या सरासरीनं 2 अर्धशतकांसह 219 धावा केल्या होत्या.

त्यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. पण, त्यानं यंदाच्या कौंटी क्रिकेटमध्ये 9 सामन्यांत 45.85च्या सरासरीनं 642 धावा केल्या आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली होती. आता तो पुन्हा भारताविरुद्ध दमदार कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. 2016च्या कौंटी स्पर्धेत लँकशायरकडून 1000 धावा करणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता.

Web Title: India vs England 2nd Test : Haseeb Hameed's first ball on his return to England's Test XI, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.