IND vs ENG, T20 WC 2026 Semi Final : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत-इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात हॅरी ब्रूक याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सेमीफायनलसारख्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणे हेच फायदेशीर वाटते. आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करणार होतो, असे सांगत सूर्यानं टॉस जिंकला नसला तरी जो प्लॅन होता त्यात कोणताही अडथळा आलेला नाही, ही गोष्ट बोलून दाखवली.
भारतीय संघाचा तोच फॉर्म्युला, इंग्लंडनं खेळला हा डाव
सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या कर्णधाराने संघाच्या कर्णधाराने एका बदलासह मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. रेहान अहमदच्या जागी जेमी ओव्हरनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
वानखेडे, वर्ल्डकपची सेमीफायनल आणि इंग्लंड, भारताला आजही सलतोय १९८७ चा ‘तो’ पराभव, आज काय होणार?
टीम इंडियासाठी ही गोष्ट जमेची बाजू ठरणार?
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने धावांचा बचाव करताना प्रत्येक सामना जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. सुपर ८ फेरीत भारतीय संघाने जो एकमेव सामना गमावला होता त्यात टीम इंडियाला धावांचा पाठलाग करताना अपयश आले होते. त्यामुळे सेमीफायनलमध्ये नाणेफेक गमावल्यावरही पहिल्यांदा फलंदाजी करण्याची मिळालेली संधी टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरू शकते. भारतीय संघाने मुंबईतील वानखेडेच्या मैदानातूनच यंदाच्या हंगामाची विजयासह सुरुवात केली होती. आता हे मैदान मारून टीम इंडिया फायनल गाठण्यासाठी प्रयत्नशील असेल.
भारत प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन :
फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.