T20I captaincy harming Suryakumar Yadav the batter? Stats show poor record for SKY : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारतीय संघानं अगदी दिमाखात विजय नोंदवला. पण या सामन्यात भारतीय संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या पदरी मात्र भोपळा पडला. जोफ्रा आर्चरनं तीन चेंडूत त्याचा खेळ खल्लास केला. एका बाजूला टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅप्टन्सीत ढासळलीये सूर्यकुमार यादवची कामगिरी
तुफान फटकेबाजी क्षमता असलेला हा गडी मागील काही सामन्यात अपयशी ठरतोना दितोय. त्याचा कॅप्टन्सीनंतरचा रेकॉर्ड तर खूपच खराब राहिला आहे. एक नजर टाकुयात टी-२० क्रिकेटमध्ये नियमित कॅप्टन्सीची जबाबदारी खांद्यावर पडल्यावर कशी राहिलीये त्याची कामगिरीच्या त्यासंदर्भातील खास आकडेवारीवर...
टी-२० संघाची कॅप्टन्सी करताना फक्त दोन फिफ्टी
२०२२ ते २०२३ या कालावधीत सूर्यकुमार यादवनं ४७ ची सरासरी अन् १७३.८ च्या स्ट्राइक रेटनं १८९७ धावा काढल्याचे पाहायला मिळाले. पण २०२३ मध्ये कॅप्टन्सीची जबाबदारी खांद्यावर पडल्यावर त्याची कामगिरी ढासळल्याचे दिसते. कॅप्टन्सी करताना त्याने आतापर्यंत २३ च्या सरासरीसह १६५.४६ च्या स्ट्राइक रेटनं २३० धावा केल्या आहेत. कॅप्टन्सीनंतर त्याच्या भात्यातून फक्त दोन अर्धशतके आली आहेत.
कॅप्टन्सीत सूर्यकुमार यादवची कामगिरी
- ५८ धावा विरुद्ध श्रीलंका
- २६ धावा विरुद्ध श्रीलंका
- ८ धावा विरुद्ध श्रीलंका
- २९ धावा विरुद्ध बांगलादेश
- ८ धावा विरुद्ध बांगलादेश
- ७५ धावा विरुद्ध बांगलादेश
- २१ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- ४ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- १ धाव विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- बॅटिंगच नाही आली विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- ० धावा विरुद्ध इंग्लंड
Web Title: India vs England 1st T20I Indian captain Suryakumar Yadav departs For A Three Ball Duck Is T20I captaincy harming as batter Stats show poor record for SKY
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.