Join us  

Ind vs Ban, Day Night Test: विराट कोहलीने 'दादा'चे गायले गोडवे; सुनील गावस्करांनी कान टोचले

भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 6:44 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अजून मजबूत केली आहे. भारताच्या खात्यात 360 गुण जमा झाले आहेत. या सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या इशांत शर्माला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पुरस्कार वितरण सोहळ्यात कर्णधार कोहलीनं भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचे कौतुक केले. या कृतीवर लिटल मास्टर सुनील गावस्कर खवळले आणि त्यांनी विराटचे कान टोचले.

बांगलादेशच्या पहिल्या डावाच्या 106 धावांच्या उत्तरात भारतानं 9 बाद 347 धावा केल्या. विराट कोहलीनं गुलाबी कसोटीत शतक झळकावण्याच्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संपूर्ण संघ 195 धावांत तंबूत पाठवून भारतानं मालिका 2-0 अशी खिशात घातली. या सामन्या भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 19 विकेट्स घेतल्या. घरच्या मैदानावर एका कसोटीत जलदगती गोलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी 2017मध्ये इडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्ध भारताच्या जलदगती गोलंदाजांनी 17 विकेट्स घेतल्या होत्या. मागील दोन वर्षांत भारताच्या जलदगती गोलंदाजांनी तिसऱ्यांदा 19 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या.

या सामन्यानंतर विराट म्हणाला,''2000च्या दशकात सौरव गांगुलीनं भारताच्या लढाऊ वृत्तीचा पाया रचला. दादाच्या संघापासून हे सुरू झाले आणि त्यानं सुरू केलेली ही विजयी परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. मागील 3-4 वर्षांत आम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ आता मिळत आहे.''  

दरम्यान गांगुलीचं कौतुक केलेलं गावस्कर यांना आवडलेले नाही. विराटची प्रतिक्रीया ऐकून असं वाटू लागलं की भारतीय क्रिकेटची सुरुवात 90च्या मध्यंतरापासून किंवा 2000 पासून सुरू झाली. 70 आणि 80च्या दशकातही भारतीय संघ कसोटी मालिका जिंकत होता, असं गावस्कर म्हणाले. ते पुढे असे म्हटले की,''गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, याची मलाही कल्पना आहे. त्यामुळेच त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलावेच लागेल. पण, आज मला असं वाटलं की भारतीय क्रिकेटची सुरुवात 2000 किंवा 1994/95पासून झाली. पण, विराटचा जन्म हा 1988चा आहे आणि त्यामुळेच त्याला हे माहित नसावं की 70 आणि 80 तही भारतीय संघ कसोटी मालिका जिंकत होते किंवा अनिर्णीत राखत होते.'' 

टीम इंडियाकडून तासाभरात बांगलादेशचा खेळ खल्लास; मालिकेत निर्भेळ यश

टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; ठरले जगात लै भारी!

 विराट कोहलीच्या नेतृत्वाला तोड नाही; भारताच्या एकाही कर्णधाराला हे जमलं नाही

टीम इंडियानं वाजवले 'बारा'; घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धींचे तीनतेरा

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीसुनील गावसकरसौरभ गांगुली