Ind vs Ban, Day Night Test : टीम इंडियानं वाजवले 'बारा'; घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धींचे तीनतेरा

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 02:40 PM2019-11-24T14:40:14+5:302019-11-24T14:40:48+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh Day Night Test Match: India crush Bangladesh by an innings and 46 runs, record 12th successive series win at home  | Ind vs Ban, Day Night Test : टीम इंडियानं वाजवले 'बारा'; घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धींचे तीनतेरा

Ind vs Ban, Day Night Test : टीम इंडियानं वाजवले 'बारा'; घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धींचे तीनतेरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या गुलाबी चेंडूवरील डे नाइट कसोटीत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर डावानं विजय मिळवला. बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून भारतीय संघाने याही मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या कामगिरीसह विराट कोहलीनं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. भारतीय संघ मायदेशात आतापर्यंत सलग 12 कसोटी मालिका जिंकले आहेत. 

बांगलादेशच्या पहिल्या डावातील 106 धावांच्या भारतानं पहिला डाव 9 बाद 347 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशला दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात शदमान इस्लामला ( 0) पायचीत केले. त्यानंतर इशांतनं बांगलादेशला आणखी दोन धक्के दिले. इम्रुल कायस ( 5) आणि कर्णधार मोमिनूल हक ( 0) यांनाही तंबूत पाठवले. उमेश यादवनं बांगलादेशला चौथा धक्का देताना मोहम्मद मिथूनला (6) बाद केले. बांगलादेशची अवस्था 4 बाद 13 अशी दयनीय झाली होती. मुश्फीकर रहीम व महमुदुल्लाहनं डाव सावरला. पण, महमुदुल्लाहला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रहीम आणि मेहीदी हसन मिराझ या जोडीनंही अर्धशतकी भागीदारी केली.  

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात बांगलादेशला धक्का दिला. उमेश यादवनं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं तिसऱ्या दिवसाची दुसरी विकेट घेताना बांगलादेशच्या मुश्फिकर रहीमला तंबूत पाठवले. रहीम एका बाजूनं नांगर रोवून बांगलादेशसाठी खिंड लढवत होता. रहीम 96 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीनं 74 धावा करून माघारी परतला. भारतानं बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांत गुंडाळून एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला. उमेश यादवनं 5,तर इशांत शर्मानं चार विकेट्स घेतल्या. भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग 12 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 

कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटनं पाचवं स्थान पटकावलं आहे. त्यानं अॅलन बॉर्डर यांचा 32 विजयांचा विक्रम मोडला. विराटच्या नावावर कर्णधार म्हणून 33 विजय आहेत. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ ( 53), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग ( 48), स्टीव्ह वॉ ( 41) आणि वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड ( 36) आघाडीवर आहेत. 

डावाच्या फरकानं कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये विराटनं क्लाईव्ह लॉईड, स्टीफन फ्लेमिंग आणि अँण्ड्य्रू स्ट्रॉस यांच्या 11 विजयांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमातही स्मिथ 22 विजयासह आघाडीवर आहे. त्यानंर स्टीव्ह वॉ ( 14) आणि पीटर मे ( 12) यांचा क्रमांक येतो. 

Web Title: India vs Bangladesh Day Night Test Match: India crush Bangladesh by an innings and 46 runs, record 12th successive series win at home 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.