India vs Bangladesh, 2nd T20I : रिषभ पंत हे तू काय केलंस? हातची विकेट गमावली

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 07:39 PM2019-11-07T19:39:48+5:302019-11-07T19:40:16+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, 2nd T20I : Stumped, but Liton Das is not out because Rishabh Pant has collected the ball in front of the stumps | India vs Bangladesh, 2nd T20I : रिषभ पंत हे तू काय केलंस? हातची विकेट गमावली

India vs Bangladesh, 2nd T20I : रिषभ पंत हे तू काय केलंस? हातची विकेट गमावली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, बांगलादेशच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून भारताच्या चमून चिंतेचं वातावरण निर्माण केलं. बांगलादेशनं पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. सहाव्या षटकात भारताला यश मिळालं होतं, परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतची एक चूक महागात पडली. 

सहाव्या षटकात रोहितनं चेंडू फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभनं स्टम्पिंग करताना लिटन दासला माघारी पाठवले. पण, तिसऱ्या पंचांनं रिषभची एक चूक पकडली अन् बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान मिळालं. पंतनं चेंडू स्टम्पच्या पुढे पकडून स्टम्पिंग केली आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल देत लिटन दासला नाबाद ठरवलं. त्यानंतर सातव्या षटकात रोहितनं लिटनचाच झेल सोडला.



 

रोहित शर्माचा पराक्रम; सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यानंतर मिळवला मान 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मैदानावर येताच रोहितनं एक विक्रम नावावर केला. शंभर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण, जगात रोहितचा दुसरा क्रमांक लागतो. या विक्रमात पाकिस्तानचा शोएब मलिक 111 सामन्यांसह आघाडीवर आहे. या कामगिरीसह रोहितनं सुनील गावस्कर आणि कपिल देव यांना मिळालेला मानही पटकावला. 

पहिल्या सामन्यात त्यानं 99 सामन्यांचा पल्ला गाठून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 98 सामन्यांचा विक्रम मोडला होता. आता त्याला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांचे शतक साजरे करण्याची संधी आहे. भारताकडून हा मान पहिला ( पुरुष/महिला) महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं पटकावला. सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने खेळणाऱ्या अव्वल पाच खेळाडूंमध्ये शोएब मलिक ( 111) , रोहित शर्मा ( 100), शाहिद आफ्रिदी ( 99), महेंद्रसिंग धोनी ( 98) आणि रॉस टेलर ( 93) यांचा समावेश आहे. शिवाय रोहितनं सुरेश रैनाचा विक्रमही मोडला. 

भारताकडून 100 ट्वेंटी-20 सामने खेळण्याचा पहिला मान रोहितनं पटकावला. वन डे क्रिकेटमध्ये हा मान कपिल देव यांनी 1987 मध्ये, तर कसोटीत हा मान सुनील गावस्कर यांनी 1984 साली पटकावला होता. रोहितनं आजच्या सामन्यातून या दोन दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले. 

 

Web Title: India vs Bangladesh, 2nd T20I : Stumped, but Liton Das is not out because Rishabh Pant has collected the ball in front of the stumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.