India vs Australia Women’s World Cup 2025 Semi final Live Streaming : महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघासमोर सातवेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन महिला संघाचे आव्हान असेल. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. इथं एक नजर टाकुया वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल कुठं अन् कशी पाहता येईल, यासंदर्भातील सविस्तर माहिती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सेमीफायनलआधी भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांच्या ताफ्यात दुखापतीचं 'ग्रहण'
साखळी फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी धावसंख्या उभा केली होती. पण एलिसा हीलीच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने ३ विकेट्स राखून आरामात सामना जिंकल्याचे पाहायला मिळाले. एलिसा हीली पिंडरीच्या दुखापतीमुळे सेमीफायनल खेळणार की, नाही ते अजूनही गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे यंदाच्या हंगामात स्मृती पाठोपाठ सर्वाधिक धावा करणारी प्रतीका रावल उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तिच्या जागी शेफाली वर्माची संघात एन्ट्री झाली असून थेट सेमीफायलमध्ये संघात वर्णी लागल्यावर दबावाच्या सामन्यात ती मोठा धमाका करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
हरमनप्रीत ते लॉरा! वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या टॉप ५ मध्ये फक्त एक पुरुष बॅटर
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
- दोन्ही संघात आतापर्यंत एकूण ६० वनडे सामने
- ऑस्ट्रेलिया- ४९ वेळा विजय
- भारत विजयी - ११ वेळा विजय
वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबा
- ऑस्ट्रेलिया : १० विजय
- भारत: ३ विजय
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला असला तरी भारतीय संघाने या तगड्या संघाला मोठ्या स्पर्धेत पराभवाचा धक्का दिल्याचा रेकॉर्डही आहे. २०१७ मध्ये डर्बीच्या मैदानातील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने हरमनप्रीत कौरनं केलेल्या १७१ धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला शह दिला होता. पहिली आयसीसी स्पर्धा जिंकून इतिहास रचण्यासाठी ८ वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने भारतीय महिला संघ मैदानात उतरेल.
सामना: भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, वर्ल्ड कप २०२५ सेमीफायनल
- दिनांक: गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५
- वेळ: दुपारी ३:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
- सामन्याचे ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
कुठे पाहात येईल सामना?
टीव्ही प्रसारण
लाईव्ह स्ट्रीमिंग
- जिओ हॉटस्टार (JioHotstar)
कोण ठरणार सामन्याचा ‘गेम चेंजर’?
- स्मृती मंधाना: भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ
- दीप्ती शर्मा (भारत) : १५ विकेट्स
- ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) १५ विकेट्स
- अलाना किंग: १३ बळींसह ऑस्ट्रेलियाची प्रमुख फिरकी गोलंदाज
नवी मुंबईतील हवामानाचा अंदाज
Accuweather नुसार, सामन्यादरम्यान २५ टक्के पावसाची शक्यता आहे. वादळी वारे किंवा गडगडाटाची शक्यता फक्त ३ टक्के आहे. सेमी फायनलचा सामन्याच्या निकालासाठी १२० मिनिटांची अतिरिक्त वेळ दिली जाऊ शकते. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे; सामना होऊ शकला नाही तर गटातील अव्वल संघ फायनलमध्ये जाईल.