IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड

कसा आहे दोन्ही संघातील वनडेतील रेकॉर्ड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:28 IST2025-10-12T11:14:52+5:302025-10-12T11:28:50+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia Women’s World Cup 2025 Live Cricket Streaming When and where to watch IND-W vs AUS-W live Know Head To Head Record | IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड

IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील १३ व्या सामन्यात भारतीय महिला संघासमोर सर्वाधिक वेळा विश्व विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघाचे आव्हान असणार आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. मेगा इवेंट आधी दोन्ही संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आलीहोती. यात पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली होती. या पराभवाची परतफेड करत यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपली दावेदारी पक्की करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. इथं एक नजर टाकुयात कुठं अन् कसा पाहता येईल भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना? कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड यासंदर्भातील माहिती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कसा आहे दोन्ही संघातील वनडेतील रेकॉर्ड?

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ १९७८ पासून एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते. आतापर्यंत दोन्ही संघात ५९ वनडे सामने खेळवण्यात आले असून यात ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. ऑस्ट्रलियन संघाने ४८ सामन्यात विजय मिळवला असून भारतीय संघाने फक्त ११ सामने जिंकले आहेत. मागील १० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ वेळा भारतीय संघाला पराभूत केले आहे.  

ENG W vs SL W : नॅटलीची कडक सेंच्युरी; इंग्लंड हॅटट्रिकसह टॉपर होऊन नटली! लंकेच्या पदरी निराशा

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड

  • एकूण सामने : १३
  • भारतीय संघ- ३ विजय  
  • ऑस्ट्रेलिया संघ-  १० विजय

कुठं पाहता येईल सामना?

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांच्या प्रेक्षपणाचे हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेल्सवर थेट प्रसारित होईल. याशिवाय जिओहॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवरही सामन्याचा आनंद क्रिकेट चाहते घेऊ शकतील.


भारतीय संघ

 हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंह ठाकुर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरूंधती रेड्डी, क्रांती गौड. 

ऑस्ट्रेलियाचा संघ

एलिसा हीली (कर्णधार), डार्सी ब्राउन, एश्ले गार्डनर, किम गार्थ, हीथर ग्राहम, एलेना किंग, फीबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिन्यु, बेथ मूनी, एलिसे पेरी, मेगन शूट , अनाबेल सदरलँड, जॉर्जिया वोल आणि जॉर्जिया वेयरहॅम.

Web Title : भारत बनाम ऑस्ट्रेलिया महिला विश्व कप 2025: लाइव स्ट्रीमिंग विवरण

Web Summary : महिला विश्व कप में भारत का मुकाबला ऑस्ट्रेलिया से। ऑस्ट्रेलिया का हेड-टू-हेड रिकॉर्ड में दबदबा। मैच स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर प्रसारित होगा। दोनों टीमों के दस्ते का विवरण दिया गया है।

Web Title : India vs Australia Women's World Cup 2025: Live Streaming Details

Web Summary : India faces Australia in the Women's World Cup. Australia dominates head-to-head records. The match will be broadcast on Star Sports and JioHotstar. Squad details for both teams are provided.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.