Join us

भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू

Shubman Gill Team India, IND vs AUS 1st Test: रोहित-गिल दोघांच्या अनुपस्थितीत एका अनुभवी खेळाडूवर मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 16:50 IST

Open in App

Shubman Gill Team India, IND vs AUS 1st Test: न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) ची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासाठी ही मालिका देखील खूप महत्त्वाची आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून (शुक्रवार) पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यातून रोहित शर्मा आधीच बाहेर झाला आहे. त्याच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाल्याने, तो सध्या कुटुंबासोबत आहे. पण त्याच्या पाठोपाठ आता पहिल्या कसोटीतून युवा सलामीवीर शुबमन गिलदेखील बाहेर होण्याच्या चर्चा आहेत. त्यासोबतच त्याच्या जागी एका अनुभवी खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

  • गिलला काय झालं?

शुभमन गिलला सराव सामन्यात दुसऱ्या स्लिपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर तो खूप वेदनेत दिसला आणि त्याने लगेच स्कॅनसाठी मैदान सोडले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे आणि कसोटी सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तंदुरुस्त होणे जवळजवळ अशक्य आहे. अंगठ्याचे फ्रॅक्चर बरे होण्यासाठी साधारणपणे १४ दिवस लागतात. त्यानंतर एखाद्याने नियमितपणे सराव सत्रात परतणे अपेक्षित असते.

  • गिलच्या जागी कोण?

पर्थ कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे स्टार फलंदाज केएल राहुलने पुन्हा एकदा नेट्स मध्ये फलंदाजीला सुरुवात केली आहे. भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यात राहुलला प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूने दुखापत झाली होती. राहुलच्या उजव्या कोपराला दुखापत झाल्याने त्याने मैदान सोडले होते पण राहुल आता पूर्णपणे तंदुरूस्त आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे.

  • गिल-रोहित दुसऱ्या कसोटीत परतणार

एडलेडमध्ये ६ डिसेंबरपासून दुसरी कसोटी सुरू होत आहे. त्या सामन्यासाठी शुभमन गिल वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. रोहित देखील तोपर्यंत ऑस्ट्रेलियात दाखल होऊन संघात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिललोकेश राहुलरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ