Join us

IND vs AUS : ... तर भारत कसोटीतील अव्वल स्थान गमावेल, दोन संघ शर्यतीत 

India vs Australia :विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी 2018 हे वर्ष परदेश दौऱ्यांच्या बाबतीत तितकेसे चांगले राहिले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 11:31 IST

Open in App
ठळक मुद्देभारताच्या अव्वल स्थानाला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडकडून धोकाभारताला मालिकेत सपशेल पराभव टाळावा लागेलभारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी 2018 हे वर्ष परदेश दौऱ्यांच्या बाबतीत तितकेसे चांगले राहिले नाही. भारतीय संघाने परदेश दौऱ्यावर सलग दोन कसोटी मालिका गमावल्या, परंतु तरीही त्यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. आसपास कोणताही संघ नसल्याने भारताला अव्वल स्थान कायम राखता आले, परंतु ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर ही क्रमवारी तशीच राहिल याची खात्री नाही. मालिकेतील अपयश भारताचे अव्वल स्थान हिरावून घेऊ शकते आणि ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड हे अव्वल स्थानावर कब्जा करू शकतो.भारतीय संघाने 125 गुणांसह 2018 वर्षाची सुरावात केली होती, परंतु दक्षिण आफ्रिकेकडून 2-1 असा आणि इंग्लंडकडून 4-1 अशा पराभवानंतर भारताने 10 गुण गमावले. तरीही त्यांचे अव्वल स्थान कायम राहिले. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिदविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका सहज जिंकून भारताने एक गुण कमावला. सध्याच्या क्रमवारीत भारतीय संघ 116 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका ( 106), इंग्लंड (105), न्यूझीलंड ( 102) आणि ऑस्ट्रेलिया ( 102) हे अव्वल पाच क्रमांत आहेत. 

भारताला अव्वल स्थान टिकवायचे असल्यास ऑस्ट्रेलियाकडून 4-0 असा पराभव टाळावा लागेल. तसे झाल्यास ऑस्ट्रेलिया अव्वल क्रम पटकावेल आणि भारताला आठ गुण गमवावे लागतील. निकाल 3-1 असा राहिला, तर भारत 111 गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिल, तर ऑस्ट्रेलिया 107 गुणांसह दुसऱ्या स्थानावर येईल. त्याशिवाय भारताला न्यूझीलंडकडूनही धोका आहे. किवींनी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असे विजय मिळवले आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-0 अशी हार मानली तरी त्यांचे अव्वल स्थान जाईल.   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयआॅस्ट्रेलियान्यूझीलंडआयसीसी