Join us

ICC Women's T20 World Cup, Final: 'या' दोन मोठ्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या, अन्यथा....

ICC Women's T20 World Cup, Final: ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हतबल केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 14:21 IST

Open in App

ICC Women's T20 World Cup, Final: ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीनं अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात हातभार लावला. मूनीनं अखेरपर्यंत खिंड लढवताना टीम इंडियासमोर डोंगराएवढं आव्हान उभं केलं. ऑस्ट्रेलियानं जवळपास ९.३० च्या सरासरीनं धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात टीम इंडियानं केलेल्या दोन मोठ्या चुका संघाला महागात पडल्या. 

 हिलीनंतर मूनी बरसली, टीम इंडियासमोर डोंगराएवढं आव्हान

हिलीनं ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. तिचे हे ट्वेंटी-२०तील १२ वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह हिलीनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हिलीचे हे अर्धशतक आयसीसी स्पर्धेतील पुरुष ( वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ) आणि महिला ( वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप)  सर्वात जलद अर्धशतक ठरले. राधा यादवने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. तिनं हिलीला वेदा कृष्णमुर्तीकरवी झेलबाद केले. हिलीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७५ धावा केल्या.  

हिली आणि मूनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१६च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर आणि हिली मॅथ्यू यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२० धावा चोपल्या होत्या. बेथ मूनीनंही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मूनीनं ऑसींना मोठी धावसंख्या उभारून दिली होती. ऑस्ट्रेलियानं ४ बाद १८४ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान आहे. मूनी ७८ धावांवर नाबार राहिली. मूनीनं ५४ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. 

या दोन चूका महागात पडल्याटीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यासाठी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माकडे चेंडू सोपवला. अॅलिसा हिलीनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून तिचे स्वागत केले. पण, पाचव्याच चेंडूवर शेफाली वर्मानं हिलीचा सोपा झेल सोडला. ऑसींनी पहिल्याच षटकात १४ धावा खेचल्या. अॅलिसा हिलीनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारी ती दुसरी ऑस्ट्रेलियन, तर एकूण ११ वी फलंदाज ठरली आहे. हिलीने बेथ मूनीसह फटकेबाजी सुरूच ठेवली. हिलीनं दीप्तीच्या दुसऱ्या षटकात ९ धावा कुटल्या. चौथ्या षटकात राजेश्वरी गायकवाडने तिच्याच गोलंदाजीवर बेथ मूनाच सोपा झेल सोडला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ४९ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार

अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; मग कोणाला मिळेल जेतेपद?

Women;s Day Special: गोवन गर्ल’ शिखाने जिंकला विश्वास, जाणून घ्या तिची गोष्ट खास!

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान

अ‍ॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

अ‍ॅलिसा हिलीने रचला मोठा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये पार केला दोन हजार धावांचा टप्पा

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतआॅस्ट्रेलिया