Join us  

ICC Women's T20 World Cup, Final: टीम इंडियाच्या कर्णधारानं सांगितला 'टर्निंग पॉईंट'; पण चुकांतून शिकण्याचा दिला सल्ला!

India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाला महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 5:54 PM

Open in App

India vs Australia ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाला महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या टीम इंडियानं दडपणाखाली खेळ केला आणि त्यामुळे त्यांची कामगिरी निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियानं पाचव्यांदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. या पराभवानंतर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं नेमकं काय चुकलं ते सांगितलं. 

अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीनं फटकेबाजी केली. हिलीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७५ धावा केल्या. हिली आणि मूनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली. मूनी ७८ धावांवर नाबाद राहिली. मूनीनं ५४ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं ४ बाद १८४ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया ९९ धावांवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं ८५ धावांनी सामना जिंकला. ऑसींनी ८६ हजार १७४ प्रेक्षकांच्या साक्षींनं पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. या सामन्यात ७५ धावांची खेळी करणाऱ्या हिलीला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली,''साखळी सामन्यात आम्ही अफलातून खेळ केला. पण, आज ते झेल सोडणं आमच्यासाठी दुर्दैवी ठरले. तरीही माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे. पुढील एक-दीड वर्ष संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे लक्ष केंद्रीत करायला हवं, विशेषतः क्षेत्ररक्षणावर.. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. पण, प्रत्येक सामन्यातून शिकायला हवं.''

''मागील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आम्ही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि यंदा अंतिम फेरीत प्रवेश केला. आमची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे, असं मला वाटतं. प्रत्येक वर्ष आमची कामगिरी सुधारत चालली आहे. पण, तरीही महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळायला हवं, हे शिकणं गरजेचं आहे. काहीवेळा ते आम्हाला जमत नाही,'' हेही कौरने कबुल केले. 

तो आला, त्यानं पाहिलं अन् तिनं जिंकलं, पाहा Video

भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात...

ICC Women's T20 World Cup, Final: भारतीय महिला संघाचं नेमकं काय चुकलं?

विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान

अ‍ॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला 

'या' दोन मोठ्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या, अन्यथा....

ऑसी महिला संघाच्या धुलाईने जाग्या केल्या 'त्या' पराभवाच्या कटू आठवणी

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतआॅस्ट्रेलिया