Join us

ICC Women's T20 World Cup, Final: टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान

ICC Women's T20 World Cup, Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 12:25 IST

Open in App

ICC Women's T20 World Cup, Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची ही अंतिम फेरीत खेळण्याची सहावी वेळ आहे. त्यामुळे पहिल्याच अंतिम फेरीत बाजी मारून जेतेपद पटकावण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणते,''आम्हालाही प्रथम फलंदाजी करायला आवडले असते, परंतु आम्ही लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करू, असा विश्वास आहे. गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांच्या धावांवर लगाम लावला पाहिजे आणि ते आमच्या फायद्याचे असेल.'' ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चार सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकले आहे.

 

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात मैदानावर पाऊल टाकताच वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हरमनप्रीत कौरचा हा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 30वा सामना आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये इतके सामने खेळणारी ती पहिलीच भारतीय आणि जगातली पाचवी खेळाडू ठरली आहे. या विक्रमात एलिसा पेरी ( 36), अॅलिसा हिली ( 34), सुजी बेट्स ( 32) आणि डेंड्रा डॉटीन ( 30) यांनी हा पराक्रम केला आहे. 

विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार

अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; मग कोणाला मिळेल जेतेपद?

Women;s Day Special: गोवन गर्ल’ शिखाने जिंकला विश्वास, जाणून घ्या तिची गोष्ट खास!

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतआॅस्ट्रेलिया