India vs Australia 4th T20 Ravi Shastri On Shubman Gill : भारतीय टी-२० संघाचा उप कर्णधार शुभमन गिल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या गोल कोस्टच्या कॅराराच्या मैदानात रंगलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात चांगली सुरुवात करून अर्धशतकाच्या जवळ जाऊन अडखळला. गिलनं ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११७.९५ च्या स्ट्राइक रेटसह ३९ चेंडूत ४६ धावा करून नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. गिल आधीच टी-२० तील खराब कामगिरीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. सोशल मीडियावर तो ट्रोल होत असताना त्यात भारतीय संघाची माजी क्रिकेटर आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या तिखट कमेंटची भर पडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रवी शास्त्रींची कमेंट चर्चेत
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेत रवी शास्त्री हे इंग्लिश कॉमेंट्री पॅनलचा भाग आहेत. चौथ्या सामन्यातील भारताच्या बॅटिंग वेळी त्यांनी शुबमन गिलसंदर्भात केलेली कमेंट आता चर्चेचा विषय ठरत आहे. शुबमन गिल हा आंतरराष्ट्रीय टी-२० साठी बनललेला खेळाडू वाटत नाही, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले. त्याची ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
गिलमुळे संजूचा प्लेइंग इलेव्हनमधील पत्ता झाला कट
शुबमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये व्यग्र असताना संजू सॅमसन भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करत होता. त्याने सलामीला कारकिर्दीत सर्वोत्तम कामगिरीही करून दाखवली. मागील दोन वर्षांत १३ सामन्यात संजूनं १८२.८९ च्या स्ट्राइक रेटनं ४१७ धावा कुटल्या आहेत. पण आशिया कप टी-२० स्पर्धेत शुभमन गिल वर्षभऱानंतर टी-२० संघात आला. त्याच्यावर उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि संजू बॅटिंग ऑर्डरमधील बदलासह प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर पडला. शुभमन गिलच्या तुलनेत संजू सॅमसन सर्वोत्तम पर्याय होता. पण गंभीरच्या मर्जीमुळे गिलला पसंती देण्यात आली, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले.
यशस्वी जैस्वाललाही बाकावर
संजू सॅसमनच नाही शुभमन गिलच्या तुलनेत यशस्वी जैस्वालच्या रुपात दिसरा सर्वोत्तम पर्याय आहे. यशस्वीनं २३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील २२ डावात १६४.३२ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या आहेत. यात त्याच्या बॅटमधून ५ अर्धशतकासह १ शतकही पाहायला मिळाले आहे. पण या दोघांना ठेंगा दाखवून गिलला पसंती देण्यात येत आहे. गिलनं ३२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील ३२ डावात १३९.३१ च्या स्ट्राइक रेटनं ३ अर्धशतके आणि एका शतकासह त्याने ८०८ धावा केल्या आहेत.
Web Summary : Shubman Gill's T20 form faces criticism after a slow innings against Australia. Ravi Shastri's comment that Gill isn't suited for T20 adds fuel to the fire, sparking debate about his place over Sanju Samson and Yashasvi Jaiswal.
Web Summary : ऑस्ट्रेलिया के खिलाफ धीमी पारी के बाद शुभमन गिल की टी20 फॉर्म की आलोचना हो रही है। रवि शास्त्री की टिप्पणी कि गिल टी20 के लिए उपयुक्त नहीं हैं, ने आग में घी डाला, जिससे संजू सैमसन और यशस्वी जायसवाल पर उनकी जगह को लेकर बहस छिड़ गई।